SBI Clerk Recruitment 2023: एसबीआय मध्ये 8283 Junior Associate पदांसाठी नोकरभरती होणार; sbi.co.in वर 10 डिसेंबर पर्यंत करा अर्ज

तर एससी, एसटी, पीडब्लूबीडी, ईएसएम, डीईएसएम मध्ये असतील त्यांना फी माफ केली जाणार आहे.

SBI | Twitter

स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून SBI Clerk Recruitment 2023 साठी अर्ज करण्याकरिता दिलेली अंतिम मुदर वाढवली आहे. आता उमेदावार 10 डिसेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान एसबीआय मध्ये 8283 Junior Associate पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना यासाठी परीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. प्रिलिम एक्झाम जानेवारी 2024 मध्ये होणार असून मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा आहेत. अधिकृत वेबसाईट वर परीक्षेची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाणार आहे.

दरम्यान एसबीआय मध्ये नोकरभरतीसाठी अर्ज करताना उमेदवार किमान ग्रॅज्युएट असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकणार आहे. त्याची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणं आवश्यक आहे तर अर्ज करणार्‍या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे. India's Most Eligible: भारतामध्ये अजूनही लग्नासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना पसंती; Shaadi.com च्या सर्वेक्षणात समोर आली माहिती .

SBI Clerk Recruitment 2023 साठी अर्ज कसा कराल?

अर्ज करताना जे उमेदवार जनरल, ओबीसी, ईडब्यूएस कॅटेगरी मधील असतील त्यांना 750 रूपये फी असणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्लूबीडी, ईएसएम, डीईएसएम मध्ये असतील त्यांना फी माफ केली जाणार आहे.