Saraswat Bank Recruitment 2021: सारस्वत बॅंक मध्ये 150 कनिष्ठ अधिकार्‍यांची भरती होणार; 19 मार्च पर्यंत saraswatbank.com वर करा ऑनलाईन अर्ज

सारस्वत बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखांमध्ये 150 कनिष्ठ अधिकारी-मार्केटिंग व ऑपरेशन्स् (लिपिक संवर्ग) या पदांकरीता अर्ज मागविले जाणार आहेत.

JOB प्रतिकात्मक फोटो (File Photo)

देशातील सर्वात मोठ्या सहकारी बॅंकेमध्ये म्हणजेच सारस्वत बॅंकेमध्ये (Saraswat Bank) आता 150 कनिष्ठ अधिकार्‍यांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारा सारस्वत बँकेच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, नागपुर, नाशिक, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, गोवा, कर्नाटक आणि गुजरात येथील शाखांमध्ये 150 कनिष्ठ अधिकारी-मार्केटिंग व ऑपरेशन्स् (लिपिक संवर्ग) या पदांकरीता अर्ज मागविले जाणार आहेत. आज 5 मार्च पासून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान हे अर्ज saraswatbank.com वर उपलब्ध असलेल्या स्वरुपात पाठवणं गरजेचे असल्याचं सांगण्यात आले आहे. RBI Recruitment 2021: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 10 वी पास असणाऱ्यांसाठी बंम्पर भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती.

महत्त्वाच्या तारखा आणि माहिती

दरम्यान इच्छुक उमेदवारांना सुरूवातीला एक ऑनलाईन परीक्षा देणं आवश्यक आहे. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. ऑनलाईन परीक्षा 160 मिनिटांची असेल यामध्ये जनरल/ फायनान्शिअल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिजनिंग एबिलिटी आणि कम्युटर अ‍ॅप्टीट्युड आणि क्वॉलिटेटीव्ह अ‍ॅप्टीट्युड अशा विषयांवर सुमारे 190 प्रश्न विचारले जातील . 50 % मार्क्स मिळवणार्‍यांना यशस्वी घोषित करून पुढील राऊंडसाठी बोलावलं जाईल.