RBI Cancelled 5 NBFC License: RBI ची मोठी कारवाई! 5 NBFC चा परवाना रद्द; तुम्हीही 'या' बँकातून कर्ज घेतले आहे का?
अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या NBFC चा परवाना RBI ने रद्द केला. ज्या कंपन्यांचे परवाने रिझव्र्ह बँकेने रद्द केले आहेत ते अॅपद्वारे कर्ज देत होते.
RBI Cancelled 5 NBFC License: भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांवर (NBFC) मोठी कारवाई केली असून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या NBFC चा परवाना RBI ने रद्द केला. ज्या कंपन्यांचे परवाने रिझव्र्ह बँकेने रद्द केले आहेत ते अॅपद्वारे कर्ज देत होते.
यूएमबी सिक्युरिटीज लिमिटेड (SBM Securities Ltd), अनाश्री फिनवेस्ट (Anashri Finvest), चढ्ढा फायनान्स (Chadha Finvest), अॅलेक्सी ट्रेकॉन (Alexcy Tracon) आणि जुरिया फायनान्शियल सर्व्हिसेस (Juria Financial Services) चे परवाने रद्द करण्यात आल्याचे केंद्रीय बँकेकडून सांगण्यात आले. या कंपन्या वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना कर्ज देत असतं. त्यामुळे डझनभर अॅप्सवरही बंदी घालण्यात आली आहे. (हेही वाचा - SBI Hikes Lending Rate: एसबीआयने ग्राहकांना दिला मोठा झटका! कर्जदरात केली 0.1 टक्के वाढ; तुमच्या EMI वर होणार 'असा' परिणाम)
RBI ने बंदी घातलेल्या या अॅप्समध्ये Mrupee, Kush Cash, flycash, Moneed, wifi कॅश यांसारख्या लोन मोबाईल ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. UBM सिक्युरिटीज फास्टअॅप टेक्नॉलॉजी नावाच्या अॅपद्वारे कर्ज देत असे. अनश्री फिनवेस्ट Mrupee, Kush Cash, Karna Loan flycash या मोबाईल अॅपद्वारे कर्ज देत असे.
दिल्लीस्थित चड्ढा फायनान्स wifi कॅशच्या मोबाईल अॅपद्वारे कर्ज देत असे. Alexei Tracon Badabro Giga म्हणून सेवा देत असे. त्याचप्रमाणे झुरिया फायनान्शियल Momo, Moneed, Cash Fish, kredipe, Rupee Master, Rupeeland या अॅप्सद्वारे कर्ज उपलब्ध करून देते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)