पंडित नेहरू यांना फॉलो करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहा त्याचा पुरावा

नेहरू जरी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान असले तरी सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी त्यांच्या बऱ्याच गोष्टी जुळतात.

Pandit Jawaharlal Nehru, PM Narendra Modi (Photo Credits: Getty/PTI)

Pandit Jawaharlal Nehru Birth Anniversary Special:  पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांचा आज वाढदिवस. नेहरू जरी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान असले तरी सध्याचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याशी त्यांच्या बऱ्याच गोष्टी जुळतात. दोन्हीही वेगळ्या पक्षांचे आणि वेगळ्या विचारसरणीतील नेते. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की या दोन व्यक्तींमध्ये साम्य असूच शकत नाही. पण फॅशन ते साहित्याची आवड, यांसारख्या बऱ्याच गोष्टी या दोघांमध्ये सारख्या आहेत (Pandit Jawaharlal Nehru and Narendra Modi similarities) .

फॅशन- ते म्हणतात ना “इतिहास अपने आप को दोहराता है” तसंच काहीसं फॅशनच्याही बाबतीत आहे. “फॅशन लौटकर वापस आती है” हे तंतोतंत खरं ठरवलं आहे मोदींनी आपल्या फॅशनमधून. पूर्वी नेहरु जॅकेट म्हणून प्रसिद्ध असणारी फॅशन आता मोदी जॅकेट नावाने बाजारात पाहायला मिळते.

योगा- योग विद्येबद्दल नेहरू आणि मोदी या दोघांनमध्येही विशेष आवड असल्याचे बघायला मिळते. पंडित नेहरू यांचे शीर्षासन करतानाचे फोटो आणि मोदी यांचे शवासन करतानाचे फोटो जर निरखून पहिले तर आपल्या लक्षात येतं की दोघंही योगासनांचे किती चाहते होते.

साहित्य- पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, लेटर फ्रॉम फादर टू हिज डॉटर अशी एकापेक्षा एक पुस्तके लिहिली तर मोदींनी एक्झाम वॉरियर्स, अ जर्नी, ज्योतिपुंज अशा पुस्तकांचे लेखन केले आहे. यातूनच त्यांची साहित्याची गोडी लक्षात येते.

वल्लभभाई पटेल यांच्याविषयी आदर- 1949 मध्ये सरदार पटेल यांचा पहिला पुतळा उभारण्यात आला होता, ज्याचे उदघाटन पंडित नेहरू यांनी केले होते. आणि आता 2018 मध्ये मोदींनी सरदार पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी”चे अनावरण केले.

Children’s Day 2019: बालदिन साजरा करताना जाणून घ्या पंडित जवाहरलाल नेहरु यांचे प्रेरणादायी विचार

नेहरु चाचा vs मोदी काका- पंडित नेहरु यांना देशातील सर्व लहान मुलं चाचा नेहरु असे म्हणत असत. आजही त्यांचा वाढदिवस भारतात 'बाल दिन' म्हणून साजरा केला जातो. तर दुसऱ्या बाजूला जनसत्ता वृत्तपत्राच्या बातमीनुसार मोदींच्या वाढदिवशी लहान मुलांनी शुभेच्छा देताना त्यांना “काका” म्हणून हाक मारली होती.