Post Office Scheme: दररोज 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 14 लाख रुपये, जाणून घ्या पोस्ट ऑफिसची 'ही' खास योजना

ग्रामीण भागातील विमा योजनेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

Post Office Scheme: आजच्या काळात प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे आहेत. परंतु, केवळ पैसे कमवणे ही मोठी गोष्ट नाही तर योग्य ठिकाणी पैसे गुंतवणे आणि बचत करणे देखील आवश्यक आहे. देशात अशा अनेक योजना आहेत, ज्या तुमच्या बचतीचे पैसे काही वर्षांत मोठ्या रकमेत बदलू शकतात. पोस्ट ऑफिस ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (Post Office Scheme Gram Sumangal Rural Postal Life Insurance) योजनेद्वारे प्रीमियम म्हणून दररोज 95 रुपये गुंतवून तुम्ही दररोज 95 रुपये गुंतवून 14 लाख रुपये कमवू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेचा मुख्य फायदा म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना पैशांसोबत विमा संरक्षण मिळते. ग्राम सुमंगल योजना ही 1995 मध्ये सुरू करण्यात आलेल्या सहा ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजनांपैकी एक आहे. (वाचा - Post Office Scheme देतेय वर्षाला 6.6% रिटर्न; पहा कशी कराल गुंतवणूक, पात्रता निकष काय आणि महत्त्वाची माहिती)

दरम्यान, ग्रामीण भागातील विमा योजनेबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राम सुमंगल पॉलिसी किंवा अपेक्षित एंडॉवमेंट इन्शुरन्स ही मुळात मनी बॅक पॉलिसी आहे. पॉलिसीची कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये आहे. पोस्ट ऑफिस ग्राम सुमंगल योजना ही वेळो-वेळी परतावा हवा असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम योजना आहे.

विमाधारकाने 20 वर्षांची पॉलिसी घेतली असेल, तर आठ वर्षे, 12 वर्षे आणि 16 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला विम्याच्या रकमेच्या 20 टक्के रक्कम मिळू शकते. त्याच वेळी, योजनेच्या परिपक्वतेवर, बोनसच्या रकमेसह विमा रक्कम देखील विमाधारकास दिली जाते.

विशेष म्हणजे 7 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी करताना, तुम्हाला दरमहा सुमारे 2850 रुपये, म्हणजेच दररोज 95 रुपये द्यावे लागतील. ही पॉलिसी घेण्यासाठी तुमचे वय किमान 19 वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत, विमाधारकाचा अनपेक्षित मृत्यू झाल्यास बोनस दिला जात नाही. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर, त्याचे संपूर्ण पैसे नॉमिनीला दिले जातात.