PAN Card Fraud: तुमच्या पॅन कार्ड नंबरचा गैरवापर करून कुणी कर्ज घेतलंय का? हे कसं घ्याल जाणून

पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो

PAN Card: | (Photo Credits: File Image)

आता व्यवहार जितके डिजिटल झाले आहेत तितकेच त्याच्यासोबत असुरक्षितता देखील वाढली आहे. नुकताच अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) अशाच सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. त्याच्या नावावर पॅन कार्ड नंबरचा (PAN Card Number) गैरफायदा घेत कुणीतरी कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे तुमच्या पॅनकार्डसोबतही अशीच छेडछाड होऊ शकते हा धोका ओळखून तुम्ही देखील अशाच फ्रॉडचे बळी ठरलेले तर नाही ना? हे नक्कीच तपासू शकता. सध्या पॅनकार्ड नंबरचा दुरूपयोग केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत त्यामुळे पॅन कार्ड शेअर करताना काळजी घ्या.

पॅन कार्डच्या गैरवापरामुळे तुम्ही बँकेचे कर्जदार बनता सोबतच तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. म्हणून जाणून घ्या कसे रहाल सुरक्षित? हे देखील नक्की वाचा: PAN Card: तुमचे पॅन कार्ड खरे आहे की खोटे? अशी पडताळून पाहा सत्यता .

तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झालाय का? कसं तपासाल?

  • पॅन नंबरचा गैरवापर झालाय का? हे तुम्ही क्रेडिट स्कोअर जनरेट करून तपासू शकता.
  • CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark यांच्या माध्यमातूनही तुमच्या नावावर कुणी कर्ज घेतलय का? हे तपासू शकता.
  • Paytm किंवा Bank Bazaar या fintech platforms वरून देखील कर्जाची माहिती मिळू शकते.
  • तुमचं नाव, जन्मतारीख, तुमच्‍या पॅन कार्ड तपशीलांसह तुम्ही पडताळणी करू शकता.

(हेही वाचा, Aadhaar Card वरुन ड्युप्लिकेट PAN Card कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)

तुम्ही तुमचे पॅन कार्ड आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नये. कारण ही कागदपत्रे अत्यंत गोपनीय असतात. जर पॅन कार्ड आणि आधार कार्डच्या फोटोकॉपी शेअर करणे अनिवार्य असेल तर त्या फोटोकॉपीवर शेअर करण्याचा उद्देश लिहावा. चित्रावर ओळीचा काही भाग दिसेल अशा प्रकारे लिहा. यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now