IPL Auction 2025 Live

PAN-Aadhaar Linking Deadline: आधार-पॅन लिकिंगचा आज शेवटचा दिवस; इथे जाणून घ्या तुमची कार्ड्स जोडलेली आहेत की नाही?

ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता.

Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

आज आधार कार्ड (Aadhaar Card) आणि पॅन कार्ड (PAN Card) लिंक करण्याचा शेवटचा दिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करण्याच्या प्रक्रियेची अंतिम मुदत संपत आहे. आता जर भारतीय नागरिकांचं आधार कार्ड- पॅन कार्ड लिंक नसेल तर त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. मग तुमचं आधार- पॅन लिंक झालं आहे की नाही? हे जाणून घेऊन टेंशन फ्री होण्यासाठी तुम्ही ऑनलाइन ते तपासून पाहू शकता. तुमची कार्ड्स लिंक असतील तर प्रश्नच नाही पण जर नसतील तर ती आजच चेक करून झटपट लिंकिंग प्रोसेस पूर्ण करून आर्थिक फटका वाचवू शकता. हे देखील नक्की वाचा: PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार जोडणी 31 मार्च पर्यंत करा अन्यथा 'या' आर्थिक दंडाला जावं लागेल सामोरे! 

आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक स्टेट्स ऑनलाईन कसं पहाल?

आधार-पॅन ऑनलाईन लिंक कसे कराल?

# ऑनलाईन आधार-पॅन लिंक करण्यासाठी इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल साईट incometaxindiaefiling.gov.in. ला भेट द्या.

# त्यातील 'Link Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.

# तिथे पॅन नंबर, आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती भरा.

# एकदा सर्व माहिती भरुन झाल्यावर 'Link Aadhaar' वर क्लिक करुन सब्मिट बटण दाबा.

ऑनलाईन प्रमाणेच तुम्ही घरबसल्या SMS च्या माध्यमातूनही पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठायचा आहे.