IPL Auction 2025 Live

पालघर लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल:पालघर मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पगडा भारी, चौरंगी लढतीत विपक्षांची बाजू कमकुवत

अनुसूचित जातींसाठी राखीव पालघाटर मतदार संघात यंदा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात बविआ, बसपा आणि काँग्रेस उमेदवारांची चोरंगी लढत पाहायला मिळाली.

Rajendra Gavit (Archived, edited, representative images) | Photo Credits: Twitter

Palghar Constituency Loksabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात (Palghar Loksabha Constitiuency) यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली होती. यामध्ये शिवसेनेचे (Shivsena) राजेंद्र गावित (Rajendra Gavit),काँग्रेस (Congress) पक्षाचे सुरेश पदवी (Suresh Padvi ) व बहुजन वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) उमेदवार बाळाराम पाटील (Balaram patil) आणि बहुजन समाजवादी पार्टीचे (Bahujan Samajvadi Party) संजय तांबडा (Sanjay Tambda) यांच्यात मतांची शर्यत लागली आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला तसेच अन्य सर्वच पक्षांच्या दृष्टीने विभाजित मतांचा प्रतिकूल अंदाज दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

जाणून घ्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचा निकाल एका क्लिकवर, पाहा लाइव अपडेट्स

पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 19 फेब्रुवारी 2008 मध्ये झाली असून यंदा पालघर मतदारसंघातील ही तिसरी निवडणूक असणार आहे. मुंबई पासून 115 किमी अंतरावर असलेला पालघर मतदार संघ अनुसुचीत जातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकूर जाधव हे 2009 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत पालघर मधून निवडून आलेले पहिले खासदार होते. Exit Poll Results 2019 India: 'एक्झिट पोल'चे अंदाज एनडीएच्या बाजूने; देशात पुन्हा मोदी सरकार

लोकसभा निवडणूक 2014 लढत आणि पार्श्वभूमी

2014 मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे चिंतामण वनांग निवडून आले होते मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर यंदा भाजपाने निवडणुकीचे तिकीट राजेंद्र गावित यांना दिले आहे. यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढवणारी गावित हे काँग्रेस पक्षाचे पूर्व नेते आहेत. पोट निवडणुकीत दामोदर शिंगडा यांचा मोठा पराभव करून गावित यांनी आपले पालघर मधील वर्चस्व दाखवून दिले होते त्यामुळे देखील यंदा लोकसभेची कवाडं गावित यांच्यासाठी उघड झाल्याचे सांगितले जातेय.