Nikhil Joshi बनले Boeing Defence India चे व्यवस्थापकीय संचालक

जोशी यांना विविध सागरी टोही विमानांवर 4,000 तासांहून अधिक उड्डाण करण्याचा अनुभव आहे. त्यांनी फ्रंटलाइन जहाजे आणि हवाई पथके या दोन्हींचे नेतृत्व केले आहे.

Nikhil Joshi (PC - X/ANI)

Managing Director Of Boeing Defense India: अमेरिकन एरोस्पेस कंपनी बोईंगने गुरुवारी निखिल जोशी (Nikhil Joshi) यांची भारतातील बोइंग डिफेन्स इंडिया (BDI) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती जाहीर केली. आपल्या निर्णयाबाबत बोईंगने सांगितले की, या नियुक्तीचा उद्देश कंपनीच्या भारतातील कामकाजाला बळकटी देण्याचा आणि विकास धोरणाला गती देणे आहे. नवी दिल्लीत राहणारे, जोशी हे बोईंग डिफेन्स इंडियाचे वर्तमान आणि भविष्यातील कार्यक्रमांचे नेतृत्व करतील ज्यामुळे भारताच्या संरक्षण दलांचे मिशनची तयारी आणि आधुनिकीकरण वाढेल.

निखिल जोशी यांना 25 वर्षांचा उत्तम अनुभव

निखिल जोशी यांना एरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्रीचा 25 वर्षांचा अनुभव आहे. भारतीय नौदलाच्या एव्हिएशन ब्रँचमध्ये त्यांनी भारतीय सशस्त्र दलात दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. जोशी यांना विविध सागरी टोही विमानांवर 4,000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच त्यांनी फ्रंटलाइन जहाजे आणि एअर स्क्वाड्रन या दोन्हींचे नेतृत्व केले आहे. याआधी त्यांनी ईटन एरोस्पेससाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम केले होते. (हेही वाचा -Indian Navy Kurta-Pyjama Dress Code: आता नौदलाचे अधिकारी आणि सैनिक कुर्ता-पायजमामध्ये दिसणार; नेव्ही ऑफिसर्स मेस-इन्स्टिट्यूटमध्ये लागू झाला नवा ड्रेस कोड (Photo))

सागरी टोही विमानांवर उड्डाण करण्याचा अनुभव

बोईंगमध्ये सामील होण्यापूर्वी, जोशी यांनी ईटन एरोस्पेससाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम केले होते. जोशी यांना विविध सागरी टोही विमानांवर 4,000 तासांहून अधिक उड्डाण करण्याचा अनुभव आहे. त्यांनी फ्रंटलाइन जहाजे आणि हवाई पथके या दोन्हींचे नेतृत्व केले आहे.

बोईंगचे एशिया पॅसिफिक क्षेत्राचे उपाध्यक्ष स्कॉट कार्पेंडेल यांनी सांगितले की, निखिलचे आमच्या संघात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि भक्कम नेतृत्व भारतातील आमची विकासाची रणनीती चालवेल. तसेच देशातील आमच्या संरक्षण ग्राहकांना सेवा देत राहण्याची आमची वचनबद्धता मजबूत करेल.

जोशी बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटी (बीडीएस) आणि बोईंग ग्लोबल सर्व्हिसेस (बीजीएस) यांच्याशी जवळून काम करतील, असे बोईंगचे म्हणणे आहे. बोईंगची भारताप्रतीची बांधिलकी आठ दशकांहून अधिक काळाची आहे. कार्यक्षम उपाय, वेळेवर समर्थन आणि निर्दोष अंमलबजावणी हे आमच्या ग्राहकांसाठी आणि भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगासाठी बोईंग डिफेन्स इंडियाच्या वचनबद्धतेचे महत्त्वाचे घटक आहेत.

बोइंगची भारतातील भागीदारी

भारत सध्या 11 C-17, 22 AH-64 Apaches (आणखी सहा ऑर्डरसह), 15 CH-47 चिनूक्स, 12 P-8Is, 3 VVIP विमाने (737 एअरफ्रेम), आणि दोन चीफ ऑफ स्टेट एअरक्राफ्ट (777 एअरफ्रेम) आहेत. हे सर्व बोईंग प्लॅटफॉर्मचे आहेत. कंपनीने सांगितले की, बोईंगच्या व्यवसाय योजनांमध्ये भारत अग्रभागी आणि केंद्रस्थानी आहे.