New Social Media Guidelines for CRPF Personnel: 'राजकीय भाष्य टाळा' सीआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी नवी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्वं जारी; घ्या जाणून
ज्यानुसार या जवान अथवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही वादग्रस्त अथवा राजकीय घटना, घडामोडींवर भाष्य करता येणार नाही.
देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल CRPF ने आपल्या कर्मचार्यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांची एक नवीन नियमावली जारी (New Social Media Guidelines for CRPF Personnel) केली आहे. ज्यानुसार या जवान अथवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही वादग्रस्त अथवा राजकीय घटना, घडामोडींवर भाष्य करता येणार नाही. सीसीएस आचार नियम 1964 (CCS conduct Rules 1964) चे उल्लंघन करणारे आणि त्यांच्या वैयक्तिक तक्रारी मांडण्यासाठी दलातील कर्मचारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे नुकतेच एका अभ्यासत पुढे आले. त्यानंतर दलाच्या दिल्लीतील येथील मुख्यालयाने सीआरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी शिस्तभंग कारवाई संदर्भात दोन पानांच्या सूचना जारी करत मार्गदर्शक तत्वे आखून दिली.
नवी मार्गदर्शक तत्वे
- नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आले आहे की, कर्मचारी जर संवेदनशील मंत्रालय किंवा संस्थेमध्ये काम करत असेल तर त्याने नेमके पोस्टिंग आणि कामाचे स्वरूप जाहीर करु नये. सोशल मीडियावर तर त्याबाबत मुळीच काही लिहू नये.
- सोशल मीडिया नेटवर्कींग साईट्स वरुन लिहीताना, व्यक्त होताना, सरकार, तुमची संस्था किंवा तुमच्या स्वत:च्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल असे काहीही करू नका. (हेही वाचा, सीआरपीएफच्या 84 व्या स्थापना दिवसा निमित्त PM Narendra Modi, Amit Shah यांच्याकडून जवानांना सलाम)
- सरकारी धोरणांवर प्रतिकूल टिप्पणी करू नका किंवा कोणत्याही सार्वजनिक मंचावर राजकीय/धार्मिक विधाने करू नका. वादग्रस्त, संवेदनशील किंवा राजकीय बाबींवर भाष्य करू नका ज्याचा भविष्यात तुम्हालाच (कर्मचारी) त्रास होईल.
- कोणत्याही प्रकारचे नाशापाणी करुन, नशेच्या अंमलात असताना सोशल मीडियावर काहीही लिहू नये. कर्मचाऱ्यासोबत असलेल्या स्पर्धा, इर्षा अथवा रागातून सोशल मीडियावर कोणताही मजकूर लिहू नये. ऑनलाईन पद्धतीने कोणाशीही गैरव्यवराह अथवा भेदभाव करु नये.
मनुष्यबळाच्या समस्या, जाहिराती, स्थानिक आदेश इत्यादी सारख्या अवर्गीकृत किंवा निरुपद्रवी असलेल्या गोष्टींबाबतही चुकीच्या पद्धतीने व्यक्त होऊ नका. जेणेकरुन बौद्धीक संपदा गोळा करणाऱ्या मंडळींना त्याचा फायदा होईल.