मुंबई: महापालिकेत 341 इंजिनियरिंग पदाची भरती, संपूर्ण माहिती घ्या जाणून
यासाठी तब्बल 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिकेतील रिक्त पदे भरली गेल्याने पालिकेच्या कामाला अधिक गती मिळणार, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
आयबीएस कंपनीमार्फत मुंबई महापालिकेत लवकरच 341 इंजिनिअरिंग पदासाठी भरती होणार आहे. यासाठी तब्बल 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिकेतील रिक्त पदे भरली गेल्याने पालिकेच्या कामाला अधिक गती मिळणार, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महत्वाचे म्हणजे, इच्छुक उमेरवारांचे अर्ज स्वीकारणे, अर्जाची छाननी, उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी तयार करणे अशी कामे पार पडण्यासाठी आयबीएस कंपनीकडून पात्र उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
महापालिकेत अभियंता खात्याच्या अभियांत्रिकी वर्गातील कनिष्ठ अभियंतासाठी एकूण 243 जागा आणि कनिष्ठ अभियंतासाठी ( यांत्रिक/ विद्युत) 98 जागा अशी एकूण 341 पदावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. महापालिकेच्या कामाला अधिक वेग मिळावा यासाठी आयबीपीएस कंपनीवर मोठी जवाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानुसार, आयबीएस कंपनीच्या मार्फत कनिष्ठ इंजिनिरिंगच्या पदावर भरती सुरु करण्यात आली आहे. पालिकेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी सादर करून त्यानंतरच त्या उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेचा प्रस्ताव आज, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. हे देखील वाचा- Indian Army मार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी भरती
भरती प्रक्रिया राबवणाऱ्या संस्थेला प्रतिविद्यार्थी 350 रुपये व इतर खर्च देण्यात येणार आहे. महापालिका एका अर्जासाठी मागासवर्गीय उमेदवारांकडून प्रत्येकी 400 रुपये तर, खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 600 रुपये परीक्षा शुल्क घेणार आहे. अधिक माहितीसाठी महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.