Lok Sabha Elections 2019: ऑनलाईन आणि SMS च्या माध्यमातून तुमचं मतदान केंद्र कसं पहाल?

तुमचं नावं मतदार यादीमध्ये असेल तर नेमकं कुठल्या मतदान केंद्रावर तुम्ही मतदान करू शकता हे पाहण्यासाठी आता ऑनलाईन आणि एसएमएसच्या माध्यामातूनही तुम्हांला समजू शकतं

Polling Booth ( Photo Credits: PTI)

महाराष्ट्रासह देशभरात 11 एप्रिलला लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections) च्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. देशात सात तर राज्यात 4 टप्प्यांमध्ये पार पडणार्‍या मतदानामध्ये अधिकाधिक नागरिकांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे. यंदा ऑनलाईन माध्यमातून मतदार नोंदणी, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ते तुमचं मतदान केंद्र (Polling Booth ) पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. Lok Sabha Elections 2019 First Phase Poll: लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भात 7, देशातील 84 मतदारसंघात उद्या मतदान होणार

अद्याप भारतामध्ये ऑनलाईन माध्यमातून ई - वोटिंग करण्याचा पर्याय खुला करण्यात आलेला नाही त्यामुळे 18 वर्षावरील आणि मतदार यादीमध्ये नाव असलेल्या प्रत्येकाला मतदान करण्याचा हक्क आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडून उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर मतदान करणं आवश्यक आहे. मग तुमचं नावं मतदार यादीमध्ये असेल तर नेमकं कुठल्या मतदान केंद्रावर तुम्ही मतदान करू शकता हे पाहण्यासाठी आता ऑनलाईन आणि एसएमएसच्या माध्यामातूनही तुम्हांला समजू शकतं. (नक्की वाचा: महाराष्ट्र लोकसभा निवडणूक मतदान पहिला टप्पा तारीख, मतदारसंघ आणि उमेदवार यादी)

मतदान केंद्र ऑनलाईन माध्यमातून कसं शोधाल?

SMS च्या माध्यमातून मतदान केंद्र कसं पहाल?

जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर तुमचं मतदान केंद्र एसएमएसच्या माध्यमातून झटपट पाहता येऊ शकतं. यासाठी मेसेज बॉक्समध्ये EPIC टाईप करा त्यापुढे स्पेस द्या पुढे तुमचा वोटर आयडी क्रमांक टाका आणि 51969 किंवा 166 या क्रमांकावर पाठवा. काही मिनिटातच तुम्हांला मतदान केंद्राची माहिती मिळेल. यामध्ये मतदान केंद्र आणि लोकेशनची माहिती असेल.

मतदार यादीमध्ये तुमचं नाव नसल्यास तुम्हांला मतदान करता येणार नाही. निवडणूकीपूर्वी काही दिवस आधी मतदार यादीमध्ये तुमचं नाव नोंदवण्याची प्रक्रिया थांबवण्यात येते. त्यामुळे मतदानादिवशी बाहेर पडण्यापूर्वी तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही? हे एकदा नक्की तपासून पहा.