Lok Sabha Election Results 2019: वायनाड येथील विजयाने राहुल गांधी यांचा नवा रेकॉर्ड; देशाच्या इतिहासात सर्वाधील मतांनी विजयी ठरलेले उमेदवार

नुकत्याच हाती लागलेल्या निकालानुसार राहुल गांधी यांना वायनाड येथे दणदणीत विजय प्राप्त झाला आहे.

राहुल गांधी (Photo Credits- PTI/File)

यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेठी (Amethi) आणि वायनाड (Wayanad) इथून उमेदवारी अर्ज भरले होते. नुकत्याच हाती लागलेल्या निकालानुसार राहुल गांधी यांना वायनाड येथे दणदणीत विजय प्राप्त झाला आहे. या वेळी राहुल गांधी यांनी प्रथमच दुहेरी मतदारसंघातून निवडणुक लढवली होती. राहुल गांधी यांना तब्बल 12,76,945  इतकी मते मिळाली आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या उमेदवाराचा इतक्या प्रचंड मतांनी विजय झाला आहे. आजपर्यंत हा रेकॉर्ड .जपच्या प्रीतम मुंडे यांच्या नावावर होता. 2014 च्या  निवडणुकीवेळी काँग्रेसचे अशोक पाटील यांना त्यांनी 6,96,321 मतांनी पराभूत केले होते.

या वेळी वायनाड मध्ये राहुल गांधी यांचा मुकाबला सीपीआयचे पीपी सुनील यांच्याशी होता, ज्यांना  4,77,783 इतेकी मते मिळाली आहेत. वायनाड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असून, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला होता.

(हेही वाचा: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव)

लोकसभा मतदारसंघाती पुनर्रचना झाल्यानंतर 2008 मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. हा मतदारसंघ कन्नूर, मल्लापूरम आणि वायनाड मतदारसंघातील काही भाग एकत्र करुन तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते एम एल शाहनावाज यांनी सलग दोन वेळा विजय प्रस्तापीत केला आहे. 2014 च्या निवडणूकीत राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता.