IPL Auction 2025 Live

ITR Filing For 2019-20 यंदा 31 डिसेंबर 2020 पूर्वी भरताना लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

दरवर्षी हा कालावधी 30 जून पर्यंत असतो पण यंदा कोरोना वायरस संकटामुळे त्याला मुदत वाढ देण्यात आली आहे.

Income Tax Filing (Photo Credits: Pixabay)

आयटी रिटर्न 2019-20 (ITR Filing For 2019-20) भरण्यासाठीची यंदाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. दरवर्षी हा कालावधी 30 जून पर्यंत असतो पण यंदा कोरोना वायरस संकटामुळे त्याला मुदत वाढ देण्यात आली असून अजून सहा महिन्यांची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान मुदत वाढवली आहे म्हणून अगदी शेवटच्या घटकेपर्यंत आरामात राहू नका. तांत्रिक घोळ, वेबसाईट डाऊन होणं किंवा माहिती गहाळ होणं अशा एक ना अनेक गोष्टींमुळे तुम्हांला वेळ लागू शकतो. लहान व्यापाऱ्यांना GST संदर्भात मोठा दिलासा, फक्त SMS च्या माध्यमातून भरता येणार Tax Return.

आयटी रिटर्न फाईल करण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

जर करदात्यांनी 31 डिसेंबर नंतर रिटर्न फाईल केल्यास त्यांना 10 हजाराचा फटका बसण्याची शक्यता आहे. ही रक्कम लेट फीच्या स्वरूपात भरावी लागणार आहे. ज्यांचं इन्कम 5 लाख पेक्षा जास्त नाही त्यांना लेट फी म्हणून 1 हजार रूपये भरावे लागतील.