Konkan Railway Recruitment 2024: कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी; konkanrailway.com वर करा अर्ज
तसेच इंजिनियरिंगच्या पदवी मध्ये विद्यार्थ्यांना किमान 60% गुण आवश्यक आहेत.
कोकण रेल्वे (Konkan Railway) कडून नोकरी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणार्या तरूण तरूणींसाठी ही एक नामी संधी आहे. कोकण रेल्वेने जारी परिपत्रकामध्ये AEE/कॉन्ट्रॅक्ट, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल, ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल अशा विविध पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवाराला 56 हजार प्रतिमहिना पर्यंत पगार दिला जाणार आहे. एकूण 42 जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे. यासाठी वॉक ईन इंटरव्ह्यू होणार आहेत.
कोकण रेल्वे मध्ये या भरतीसाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंग ची पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक आहे. तसेच इंजिनियरिंगच्या पदवी मध्ये विद्यार्थ्यांना किमान 60% गुण आवश्यक आहेत. एका वर्षासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी अधिकृत वेबसाईट konkanrailway.com वर जाऊन आपला अर्ज अंतिम मुदतेपूर्वी भरायचा आहे. ०५,१०, १२, १४, १९, २१ जून २०२४ दिवशी उमेदवारांच्या मुलाखतींचं आयोजन केले आहे. इथे पहा नोकर भरतीचं परिपत्रक .
कोकण रेल्वे मध्ये होणार्या या भरतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 30 वर्षाची वयोमर्यादा आहे. सरकारी नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांसाठी एससी/एसटी ०५ वर्ष सूट दिली गेली आहे. ओबीसी कॅटेगिरीच्या उमेदवारांना ३ वर्षे सूट दिली गेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या वयोगटांनुसार पदांसाठी अर्ज करायचा आहे.
कोकण रेल्वे भरती प्रक्रिया 9 मे पासून सुरु झाली असून याची अंतिम तारीख 21 मे 2024 असणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करणं आवश्यक आहे.