
कल्याण सट्टा मटका (Kalyan Satta Matka) हा एक जुगारामधील लोकप्रिय खेळ आहे. सट्टा मटका 1960 च्या दशकात सुरू झाला आणि हळू हळू त्याची क्रेझ वाढत गेली. भारतामध्ये प्रामुख्याने हा खेळ मुंबई शहरात सुरू झाला. मग आजुबाजूच्या शहरातही त्याची लोकप्रियता पसरली. नशीबाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ विजेत्याचं आयुष्य एका रात्रीत बदलतो तर हरणारा व्यक्ती पैसे गमावतो.
सट्टा मट्टाच्या खेळामध्ये आकड्यांवर दाव लावले जातात आणि ज्याचं नशीब साथ देईल त्याला हा आकड्यांचा क्रम बरोबर लागतो. सट्टा मटका ची सुरूवात कल्याणजी भगत यांनी केली असं सांगितलं जातं. पण पुढे वाढत गेलेली लोकप्रियता आणि त्यामधून होणारे गैरप्रकार पाहता सरकारने या खेळावर बंदी घातली. आता सुरू असलेला सट्टा मटका हा अवैध प्रकारे सुरू आहे.
कल्याण पॅनल चार्ट काय असतं?
कल्याण पॅनल चार्ट हा या खेळाचाच एक भाग आहे. पॅनल चार्ट वर एकाप्रकारचा रेकॉर्ड दिसतो. ज्यात खेळाचा निकाल दिसतो. यामध्ये खेळाडूला यापूर्वी कोणता आकडा आला होता याची माहिती मिळते. कल्याण पॅनल चार्टचा वापर करून अनेक जण त्यांच्या खेळाचं पुढील प्लॅनिंग देखील करतात.
सट्टा मटका हा खुलेआम खेळला जात नाही. त्यामुळे जोखिम असलेल्या या खेळात अनेक गोष्टी केवळ नशीबावर सोडल्या जातात. यामध्ये खेळताना देखील सतर्कता आवश्यक आहे.सट्टा मटका ला कायदेशीर परवानगी नसल्याने तो खेळताना विशेष काळजी खेळली जाते.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.