Kalyan Satta Matka Mumbai: मुंबई चा कल्याण मटका काय असतो? कशी झाली त्याची सुरूवात
हा चार्ट 1960 -1970 च्या दशकामध्ये अस्तित्त्वामध्ये आला आहे.
भारतामध्ये सट्टेबाजी चा खेळ सट्टा मटका (Satta Matka) मागील काही वर्षांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. हा लोकप्रिय भारतीय जुगाराचा खेळ 1950 च्या दशकापासून सुरू झाला. या खेळामध्ये कल्याण चार्ट (Kalyan Satta Matka) महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मग हा कल्याण चार्ट काय आहे त्याची रचना काय असते आणि त्याचा उपयोग काय? हे देखील पहा.
कल्याण चार्ट चा इतिहास सट्टा मटका च्या उदयासोबत झाला आहे. हा चार्ट 1960 -1970 च्या दशकामध्ये अस्तित्त्वामध्ये आला आहे. सुरूवातीच्या दिवसांमध्ये स्पर्धकांच्या हातानेच बनवला जात होता. ज्यामध्ये दररोज खेळाचा निकाल देखील ध्यानपूर्वक नोंदवला जात असे. What is DpBOSS Satta Matka Website? डीपीबॉस काय आहे? सट्टा मटका बाजारामध्ये त्याची इतकी चर्चा का?
सट्टा मटका ची लोकप्रियता
रतन खत्री याने सुरू केलेल्या मटका ला सुरू करताच त्याला लोकप्रियता मिळत गेली. त्यावेळी हा खेळ 0 ते 9 पर्यंत अंकांच्या निवडीवर होता. या अंकांना कागदाच्या तुकड्यांवर लिहलं जातं असे आणि तो कागद मटक्यामध्ये टाकला जात होता. नंतर एक व्यक्ती त्या मटक्यामधून 3 अंक काढत होती. त्यामधून एक विनिंग कॉम्बिनेशन बनत होते.
खेळाला पारदर्शी आणि निष्पक्ष बनवण्यासाठी विनिंग कॉम्बिनेशन हे सार्वजनिक ठिकाणी काढली जात होती. यामुळे मोठी गर्दी आकर्षित केली जात होती. ड्रॉ च्या दिवसातून अनेकवेळा काढले जात होते. यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साह राहत होता. विजेत्यांना मोठी बक्षीसं मिळत होती. त्यामुळे लोकांना याचं आकर्षण होतं. Satta Matka to DpBOSS in India: भारतामध्ये कशी झाली सट्टा मटकाची सुरूवात? पहा त्याचा इतिहास.
वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.