IPL Auction 2025 Live

अभिमानास्पद! जगातील नामांकित कंपन्यांमध्ये Infosys तिसऱ्या स्थानी; टॉप 250 मध्ये भारतातील 17 कंपन्या, पहा यादी

ग्लोबल पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी व्हिसा प्रथम आणि इटालियन कार निर्माता कंपनी फेरारी दुसर्‍या क्रमांकावर आहे.

File image of Infosys | (Photo Credits: PTI)

फोर्ब्सने (Forbes) नुकतीच जगातील नामांकित कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 17 भारतीय कंपन्यांना स्थान मिळाले आहे. त्यामध्ये इन्फोसिस, टीसीएस आणि एचडीएफसी अशा काही प्रमुख कंपन्या आहेत. महत्वाचे म्हणजे या यादीमध्ये आयटी कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे (3rd Best Regarded Company). ग्लोबल पेमेंट टेक्नॉलॉजी कंपनी व्हिसा प्रथम आणि इटालियन कार निर्माता कंपनी फेरारी दुसर्‍या क्रमांकावर आहे. मागील वर्षी या यादीमध्ये इन्फोसिस 31 व्या क्रमांकावर होती. यावर्षी ही कंपनी चक्क 3 ऱ्या क्रमांकावर आहे ही भारतासाठी एक अभिमानस्पद बाब आहे.

याबाबत फोर्ब्सने सांगितले, इन्फोसिसच्या रँकिंगमुळे आशियातील परिस्थितीला एक मोठे स्थान प्राप्त झाले आहे. वर्ष 2019 साठी जाहीर केलेल्या फोर्ब्सच्या यादीमध्ये नेटफ्लिक्सचा चौथा क्रमांक आहे, त्यानंतर पे पाल, मायक्रोसॉफ्ट, वॉल्ट डिस्ने, टोयोटा मोटर, मास्टरकार्ड, कोस्टको होलसेल टॉप 10 आहे. इतर भारतीय कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 22 व टाटा मोटर्स 31 व्या स्थानावर आहेत. या दोन भारतीय कंपन्यांना पहिल्या 50 मध्ये स्थान मिळाले आहे. (हेही वाचा: 108 वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा करार; तब्बल 2.34 लाख कोटी रुपयांना IBM ने विकत घेतली Red Hat ची मालकी)

याशिवाय ज्या भारतीय कंपन्यांचे नाव पहिल्या 250 मध्ये आहे त्यामध्ये,  टाटा स्टील (10), लार्सन अँड टुब्रो (115)), महिंद्रा अँड महिंद्रा (117), एचडीएफसी (135), बजाज फिनजर्व (143), पिरामल एंटरप्राइजेज (149)), स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (153), एचसीएल टेक्नोलॉजीज (155), हिंडाल्को इंडस्ट्रीज (157), विप्रो (168), एचडीएफसी बँक (204), सन फार्मा इंडस्ट्रीज (217), जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (224), आयटीसी (231) आणि एशियन पेंट्स (248) यांचा समावेश आहे.

फोर्ब्सच्या या यादीत अमेरिकेचे वर्चस्व आहे. 250 कंपन्यांच्या यादीमध्ये 59 कंपन्या अमेरिकेच्या आहेत. तसेच जपान, चीन आणि भारतही आघाडीवर आहेत. यामध्ये एकूण 250 कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या आशियातील आहेत. जगातील एकूण 2000 कंपन्यामधून या 250 कंपन्यांची निवड केली आहे.