IPL Auction 2025 Live

E-Ticket Booking via UTS Mobile App: भारतीय रेल्वे यूटीएस मोबाइल ॲपद्वारे ई-तिकीट बुकिंग प्रक्रिया केली सुलभ; जिओफेन्सिंग निर्बंध हटवले, घ्या जाणून

हे अपडेट प्रवाशांना कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही गंतव्यस्थानापर्यंत तिकीट बुक करण्यास अनुमती देते.

Indian Railway Chief Ticket Inspector (Image Credit : Indian Railway Twitter)

भारतीय रेल्वेने जिओफेन्सिंग निर्बंध हटवून अनारक्षित तिकीट प्रणाली (UTS) मोबाइल ॲपद्वारे ई-तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. UTSonMobile ॲप, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) द्वारे विकसित केलेला GPS-आधारित अनुप्रयोग, वापरकर्त्यांना त्यांच्या नियुक्त बोर्डिंग स्टेशनच्या विशिष्ट अंतरावर (किमान 15 मीटर आणि 2 किमीच्या आत) तिकीट बुक करणे अनिवार्य केले होते. स्मार्टफोनच्या GPS निर्देशांक वापरून ही आवश्यकता निर्धारित केली गेली.. आता त्याची आवश्यकता असणार नाही. CRIS ने अलिकडेच त्याबाबत एक परिपत्रक जारी केले.

जिओफेन्सिंग निर्बंध हटवले

CRIS ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे बोर्डाने UTSonMobile ॲपवरील प्रवास आणि प्लॅटफॉर्म तिकिट या दोन्हीसाठी बाह्य मर्यादा जिओफेन्सिंग निर्बंध काढून टाकण्याची सूचना दिली आहे, जी तत्काळ कार्यकरत होईल. हे अपडेट प्रवाशांना कोणत्याही ठिकाणाहून कोणत्याही गंतव्यस्थानापर्यंत तिकीट बुक करण्यास अनुमती देते. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा विचारात न घेता. उदाहरणार्थ, सीएसएमटी येथील प्रवासी आता कोणत्याही स्थानकावर प्रत्यक्ष उपस्थित न राहता कुर्ला ते ठाणे या प्रवासासाठी तिकीट बुक करू शकतात. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रवास तिकीट बुकिंगच्या एक तासाच्या आत मूळ स्थानकापासून सुरू झाला पाहिजे. (हेही वाचा, India Railway: जनरल क्लासने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेकडून 20-50 रुपयांत स्वस्तात जेवण)

फलाट किंवा ट्रेनमध्ये तिकीट नोंदणी करण्यास मनाई

दरम्यान, नव्या सेवेचा लाभ घेत असताना प्रवाशांना स्टेशन परिसरात किंवा ट्रेनमध्ये असताना ॲपद्वारे ई-तिकीट बुक करण्यास अद्याप मनाई आहे. ट्रेनसह प्रतिबंधित भागात प्रवेश केल्यानंतर तिकीट बुकिंग रोखणे हा यापाठीमागचा उद्देश आहे. UTSonMobile ॲपचा अधिकाधिक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय अपेक्षित आहे, जे सध्या 25 टक्के प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी सेवा देतात. (हेही वाचा : Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)

भारतीय रेल्वे ही भारतातील सर्वात मोठी आणि दीर्घ पल्ल्यासाठी सेवा देणारी सरकारी प्रणाली आहे. ज्याद्वारे देशभरातील लक्षवधी लोक दररोज प्रवास करतात. हे प्रवासी नेहमी तिकीट काढून प्रवास करत असले तरीही अनेक लोक विनातिकीट प्रवासास प्राधान्य देतात. अनेक अभ्यासांमधून हे पुढे आले आहे की, प्रवाशांना तिकीट काढायचे असते मात्र तिकीटविक्री केंद्रावर असलेली गर्दी, कामाच्या बदलत्या वेळा, कामातील व्यग्रता, प्रत्यक्ष तिकीट खरेदीसाठी लागणारा विलंब यांसह इतरही अनेक कारणांमुळे लोक विनातिकीट प्रवास करतात. यावर उपाय म्हणून तिकीट नोंदणी सुलभ व्हावी यासाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकीटाचा पर्याय आणला आहे.