IND vs PAK, ICC World Cup 2019: पाकविरुद्ध विराट कोहली उभारणार धावंच नवीन शिखर, तेंडुलकरलाही टाकणार मागे

कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे.

Virat Kohli (Image: PTI/File)

भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळताना कोणता नं कोणता तरी विक्रम मोडून टाकतो किंवा बनवतो. म्हणूनच त्याच्या विक्रमाची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) च्या विक्रमांशी करतात. दरम्यान, आजच्या भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan)  सामन्यादरम्यान कोहलीला तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. आज पाकविरुद्ध 57 धावा केल्यास कोहली तेंडुलकरच्या आणखी एका विक्रमाला गवसणी घालून वनडे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तिसरा भारतीय खेळाडू बनेल. (IND vs PAK, ICC CWC 2019: मॅन्चेस्टर सामन्यात राहुल द्रविडचा हा विक्रम मोडण्याची एम एस धोनीला संधी)

कोहलीच्या नावावर सध्या 221 डावांत 10943 धावा आहेत आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्याचा नावावर आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी हा पल्ला पार केला आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातल्या जय-पराजयाच्या आकडेवारीत भारतीय संघ 6-0 अशा आघाडीवर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारा भारतीय संघ तिच विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे.