PPF, NSC, SSY या योजनांमधील गुंतवणूकीवर मिळते प्राप्तिकर सूट; जाणून घ्या नियम

यातील बरेच गुंतवणूक पर्याय असे आहेत, जेथे गुंतवणूकदारास प्राप्तीकरातून सूट मिळते.

India Money | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

एफडी, पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धी योजना भारतातील सुरक्षित गुंतवणूकीसाठी उत्तम पर्याय आहेत. यामध्ये लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांचा समावेश आहे. या गुंतवणूक योजनांमध्ये ग्राहकांची गुंतवणूक सुरक्षित आहे. यातील बरेच गुंतवणूक पर्याय असे आहेत, जेथे गुंतवणूकदारास प्राप्तीकरातून सूट मिळते. तुम्ही करत असलेल्या गुंतवणूकीवर आयकर सूट मिळते की, नाही याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

पीपीएफ योजना EEE स्थितीसह येते. याचा अर्थ असा आहे की, या योजनेत तीन ठिकाणी कर लाभ मिळतो. या योजनेत, योगदान, व्याज उत्पन्न आणि परिपक्वताच्या वेळी प्राप्त झालेली रक्कम करमुक्त आहेत. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत ही योजना कर लाभ प्रदान करते.

सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाय) -

पीपीएफ प्रमाणेचं या योजनेतील मुदतीच्या कालावधीत गुंतविलेल्या रकमेवरील व्याज करमुक्त आहे. या योजनेत केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी):

आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये केलेली गुंतवणूकसुद्धा सूट मिळण्यास पात्र आहे. या प्रमाणपत्रांमध्ये गुंतवणूकीस मिळालेले व्याज कर सूट पात्र आहे. येथे गुंतवणूकीचे उत्पन्न मुदतपूर्तीच्या वर्षासाठी वगळता अक्षरशः करमुक्त आहे.

फिक्स डिपॉझिट (एफडी):

मुदत ठेवींमधील गुंतवणूकीवर मिळणाऱ्या व्याजातून बँका 10% टीडीएस वजा करतात. जर आपण जास्त कर पर्यायामध्ये बसत असाल तर आपल्याला अतिरिक्त कर भरावा लागेल.