How To Vote #India Google Doodle: मतदान कसं करावं हे सांगणारं आजचं खास गूगल डूडल
how to vote #India च्या माध्यामातून मतदान कसं करावं हे आज गूगल भारतीय मतदारांना सांगणार आहे.
Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019चा आज चौथा आणि अंतिम टप्पा आहे. 29 एप्रिल म्हणजे आज देशात 9 राज्यांमध्ये 71 मतदारसंघात मतदान होईल. महाराष्ट्रामध्ये आज 17 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. आज सकाळपासूनच सेलिब्रिटी, सामान्य नागरिक आणि राजकारण्यांनी मतदान करण्यासाठी रांगेत उभं राहणं पसंत केले आहे. आज गूगलनेदेखील खास गूगल डूडलच्या (Google Doodle) माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. how to vote #India च्या माध्यामातून मतदान कसं करावं हे आज गूगल (Google) भारतीय मतदारांना सांगणार आहे. मतदान कसे करावे #भारत: ‘वंचित ना राहो कुणी मतदार’ साठी निवडणूक आयोग सज्ज, पहा कोणत्या ओळखपत्रावर करू शकता लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान?
कसं कराल लोकसभा निवडणूक 2019 मतदान?
- 18 वर्षावरील सज्ञान नागरिक त्याच्या ओळखपत्रासोबत मतदान करू शकतो.
- मतदान करण्याची अनुमती केवळ ज्याचं नाव अधिकृत मतदान यादीमध्ये आहे त्यांनाच मिळू शकतो.
- मतदार यादीमध्ये नाव पाहिल्यानंतर तुमचं ओळखपत्र पाहिलं जाईल. तुम्हांला निवडणूक आयोगाच्या रजिस्टरवर स्वाक्षरी / अंगठा द्यावा लागतो.त्यानंतर तुमच्या बोटावर शाई लावली जाईल.
- पुढे ईव्हीएम मशीनवर तुम्हांला ज्यांना मतदान करायचं आहे त्याच्या नाव आणि चिन्हासमोरील बटण दाबून मत रजिस्टर करता येऊ शकतं.
- तुम्ही ज्याला मतदान केलं आहे त्याच्यासमोर लाल रंगाचा बटण काही काळ ऑन दिसेल.
- यंदा ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट मशीनदेखील असतील. त्यामध्ये तुम्ही दिलेले मत योग्य उमेदवाराला किंवा नोटाला दिले आहे की नाही याची तुम्हांला माहिती स्क्रीनवर आणि एका स्लिपच्या माध्यमातून मिळेल. Lok Sabha Elections 2019 Fourth Phase Voting Live Updates: देशात आज 71 मतदारसंघांमध्ये मतदान, महराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा
23 मे दिवशी या मतदानाची मतमोजणी होणार आहे. आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement