ITR FY 2020-21 आयकर विभागाचं नवं पोर्टल incometax.gov वर 30 सप्टेंबरपूर्वी कसा फाईल कराल? इथे पहा स्टेप बाय स्टेप
आयटीआर साठी आता खास मोबाईल अॅप देखील लॉन्च केले आहे.
आर्थिक वर्ष 2020-21चा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा यंदाचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर 2021 आहे. कोरोना संकटामुळे यापूर्वी आयकर विभागाकडून अनेकदा टॅक्स पेयर्सना मुदतवाढ देण्यात आली होती. आता करदात्यांना हा टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुकर व्हावी म्हणून आयकर विभागाने नुकतेच - www.incometax.gov.in हे नवं पोर्टल लॉन्च केले आहे. Rules Changing From 1st April: नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे '6' नियम.
दरवर्षी आयटीआर फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै असते. नोकरदार व्यक्ती त्यांच्या कंपनीकडून फॉर्म 16 आल्यानंतर आपला आयटीआर फाईल करतात. त्यामुळे अद्याप तुम्ही आयटीआर भरला नसेल तर त्या संबंधीची सारी कागदपत्र तयार ठेवा यामध्ये फॉर्म 16 पासून अगदी बॅंक अकाऊंटचे डिटेल्स पर्यंत अनेक गोष्टी आहेत.
आयटीआर स्टेप बाय स्टेप कसा भराल?
- आयटीआर पोर्टल www.incometax.gov.in ला भेट द्या. पॅन सोबतच आता नव्या पोर्टलला आधार आणि TAN देखील जोडलेले असेल.
- ई फाईल टॅब मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न वर क्लिक करा. त्यानंतर 'फाईल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.
- असेसमेंट इयर निवडा.
- त्यानंतर आयटीआर फाईल करण्यासाठी मोड निवडा. ऑनलाईन पर्यायाची शिफारस केलेली असते.
- start filing new ITR या पर्यायावर क्लिक करा.
- individual, HUF आणि others असे तीन पर्याय दिसतील त्यापैकी individual निवडा.
- त्यानंतर आयटीआर टाईप निवडा.
- आयटीआर फाईल करण्याचं कारण निवडा त्यानंतर विचारलेली माहिती भरा.
- त्यानंतर काहींना शुल्क भरण्यासाठी विचारलं जाईल.
- यानंतर तुमचा आयटीआर प्रिव्ह्यू पाहून तो सबमीट करू शकता.
- व्हेरिफिकेशन साठी प्रोसिड वर क्लिक करा.
- त्यानंतर व्हेरिफिकेशन मोड निवडा.
- आयकर विभागाकडून तुम्हांला डिजिटल साईनचा देखील पर्याय दिला जाईल. तुम्ही हा पर्याय निवडला असेल तर डिजितल सिग्नेचर द्यावी लागेल. इथे आधार सिग्नेचर अपलोड करण्याचाही पर्याय असेल.
- डिजिटली साईन नसेल तर व्हेरिफाईंग साठी EVC/OTP सबमीट करा.
2021 मध्ये आयटीआर साठी आयकर विभागाने 7 फॉर्म्स दिले आहेत. Sahaj (ITR-1), Form ITR-2, Form ITR-3, Form Sugam (ITR-4), Form ITR-5, Form ITR-6 and Form ITR-7 यांचा समावेश आहे. आयटीआर साठी आता खास मोबाईल अॅप देखील लॉन्च केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)