SBI vs HDFC Bank vs ICICI Bank: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणत्या बँकेची स्कीम ठरेल अधिक फायदेशीर? जाणून घ्या

ज्येष्ठ नागरिकांकडून एफडीला मिळत असलेली पसंती पाहता अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट वर चांगल्या स्कीम देण्यास सुरुवात केली.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

एफडी (FD) हा गुंतवणुकीचा सर्वात चांगला मार्ग असल्याची ज्येष्ठ नागरिकांची धारणा असते. ज्येष्ठ नागरिकांकडून एफडीला मिळत असलेली पसंती पाहता अनेक बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट वर चांगल्या स्कीम देण्यास सुरुवात केली. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एचडीएफसी बँक (HDFC Bank) या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर चांगला परतावा देत आहेत. यातच या बँकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम सादर केली आहे आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी अंतिम तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

प्रत्येक बँक स्पेशल एफडी स्कीमवर वेगवेगळे रिटर्न्स देत आहे. त्यामुळे एफडीवर नेमका किती परतावा मिळेल हे जाणून घेणे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या बँकेची स्कीम अधिक फायदेशीर ठरेल... (Investment Tips: SBI, PNB आणि Axis कोणत्या बँकेमध्ये Fixed Deposits वर मिळेल सर्वाधिक व्याज? जाणून घ्या)

SBI स्पेशल FD स्कीम:

एसबीआय सामान्य खातेधारकांना पाच वर्षांच्या एफडीवर 5.40 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेच्या विशेष एफडी योजनेअंतर्गत 6.20 टक्के व्याज देत आहे. याशिवाय एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांना 30 बेसिस पॉईंट अधिक व्याज देण्याचे आश्वासनही दिले आहे. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने एसबीआयची विशेष एफडी योजनेत गुंतवणूक केली तर त्याला 0.80 टक्के अतिरिक्त परतावा मिळेल. तर एखाद्याच्या एफडीला वार्षिक परतावा 6.20 टक्के (5.40 + 0.50 + 0.30) मिळेल.

HDFC Bank FD स्पेशल स्कीम:

एचडीएफसी बँक विशेष एफडी योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 75 बीपीएस वार्षिक उत्पन्न देत आहे. तसंच 75 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 0.75% जास्त व्याज दर देत आहे. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने निश्चित ठेव केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के असेल.

ICICI Bank स्पेशल FD स्कीम:

आयसीआयसीआय बँक 5 वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर 5.5% वार्षिक परतावा देत आहे. आयसीआयसीआय बँकेच्या ज्येष्ठ नागरिक विशेष एफडी योजनेंतर्गत एफडी खाते उघडणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना बँकेने अतिरिक्त 80 बीपीएस वार्षिक परतावा देऊ केला आहे. या योजनेत बँक 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 6.30 टक्के (5.50 + 0.80) व्याज देते.

वरील व्याजदराची तुलना केल्यास ज्येष्ठ नागरिक विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी बँक किंवा एसबीआयपेक्षा आयसीआयसीआय बँकेकडून अधिक परतावा मिळेल.