1 जानेवारी 2019: बँकिंग क्षेत्रात मोठे फेरबदल; चेकबुक, एटीएम कार्ड तपासा
1 जानेवारी 2019: हे सर्व बदल नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून सुरु होत आहेत. या बदलांना सकारात्मकपणे तुम्ही पुढे गेला नाहीत तर, तुम्हाला सहजपणे आर्थिक व्यवहाराच करता येणार नाहीत.
Happy New Year 2019: नववर्षाच्या स्वागतासाठी देशभरात जय्यत तयारी सुरु आहे. 2018 या वर्षाला निरोप देत 2019 या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. नवं वर्ष नव्या नवलाईसह अनेक नवे बदलही घेऊन येणार आहे. यात बँकिंग क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करताना बँकिंग क्षेत्रात तुमच्या दैनंदिन कामाशी निगडीत काय बदल होणार आहेत हेही जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. महत्त्वाचे असे की, हे सर्व बदल नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे 1 जानेवारी 2019 पासून सुरु होत आहेत. या बदलांना सकारात्मकपणे तुम्ही पुढे गेला नाहीत तर, तुम्हाला सहजपणे आर्थिक व्यवहाराच करता येणार नाहीत.
डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये मोठे बदल ( ATM & Debit Cards)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थाच आरबीआय ने 31 डिसेंबर 2018 पूर्वी मॅग्नेटीक स्ट्रिपवाले डेबिट, क्रिडीट कार्ड बदलण्यास सांगितले होते. त्याच्या जागी 1 जानेवारी 2019पासून इएमव्ही चिप असणारे कार्ड वापरले जाणार आहेत. त्यामुही जुनी (मॅग्नेटीक स्ट्रपयुक्त कार्ड) आपोआपच बंद होणार आहेत. त्यामुळे जर केला नसेल तर तुम्हीही या कार्डमध्ये लवकर बदल करुन घ्या.
जुने चेकबुक कालबाह्य (Old Checkbook Expired)
दरम्यान, तुम्ही आर्थिक व्यवहारांसाठी जुने चेकबुक वापरत असाल तर, तेही आता कालबाह्य होणार आहेत. म्हणजेच व्यवहारासाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्या ऐवजी आता आपल्याला सीटीएस असणारे चेकबुक घ्यावी लागणार आहेत. सीटीएस चेकला क्लिअर होण्यासाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवण्याची गरज भासणार नाही. (हेही वाचा, 31 डिसेंबर पूर्वीच क्रेडिट, डेबिट कार्ड्स Magnetic Stripe Cards ऐवजी EMV chip युक्त करा अन्यथा ...)
इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Returns)
2017-2018 या काळातील इनकमटॅक्स भरण्याची अंतम तारिख 31 जुलै 2018 होती. पुढी ही तारिख वाढवून 31 डिसेंबर 2018 करण्यात आली होती. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही ही प्रक्रिया पार पाढली असेल तर, तुम्हाला 5 हजार दंड भरावा लागणार होता. मात्र, आता ही मुदतही तुम्ही उलटवली असेल तर तुम्हाला थेट 10 हजार रुपये इतका दंड भरावा लागू शकतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)