Government Jobs 2023: ईपीएफओ मध्ये होणार Stenographer ची भरती; आज अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
EPFO Recruitment 2023: Employees Provident Fund Organisation अर्थात ईपीएफओ (EPFO) मध्ये स्टेनो आणि सोशल सिक्युरिटी असिस्टंट या पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. त्या पदांसाठी अर्ज सादर करण्याची आज 26 एप्रिल ही अंतिम मुदत आहे. दरम्यान ऑनलाईन माध्यमातून स्टेनोग्राफर ग्रुप सी (Stenographer (Group C)) आणि सोशल सिक्युरिटी असिस्टंट (Social Security Assistant posts) ग्रुप सी पदासाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छूक उमेदवारांना recruitment.nta.nic.in वर अर्ज करता येणार आहे.
ईपीएफओ मध्ये एकुण 2859 पदांसाठी नोकर भरती होणार आहे. त्यामध्ये 185 जागा स्टेनो तर 2674 जागा सोशल सिक्युरिटी असिस्टंट पदांसाठी असणार आहेत. EPFO Withdrawal For Marriage: EPF सदस्य लग्नासाठी सहज काढू शकता शिल्लक रक्कम, जाणून घ्या, काय आहेत अटी .
EPFO Recruitment 2023 साठी कसा कराल अर्ज?
- NTA recruitment ची अधिकृत वेबसाईट recruitment.nta.nic.in वर क्लिक करा.
- होम पेज वर तुम्हांला 'Recruitment Examinations of Employees’ची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुम्हांला ज्या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्याच्या अप्लाय लिंक वर क्लिक करा.
- आवश्यक डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट फी भरण्यासाठी क्लिक करा.
- आता अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करून त्याची प्रिंट आऊट काढा. म्हणजे त्याचा भविष्यात वापर केला जाऊ शकतो.
पहा ट्वीट
ईपीएफओ मध्ये अर्ज करणार्यांसाठी कमाल वयोमर्यादा 18 ते कमाल मर्यादा 26 ऑगस्ट असणं आवश्यक आहे. अनारक्षित वर्गातील उमेदवारांना 700 रूपये फी आकारली जाणार आहे. तर एसी, एसटी, महिला, माजी सर्व्हिसमेन यांच्यासाठी कोणतेही शुल्क नसेल.