Order Food on Trains: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता तुम्ही ट्रेनमध्येही WhatsApp वरून मागवू शकता तुमच्या आवडीचे पदार्थ; 'अशी' करा ऑर्डर
आता तुम्ही कोणतेही अतिरिक्त अॅप्स डाउनलोड न करता व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही आगामी स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरू शकता.
Order Food on Trains: ट्रेनमध्ये तुमच्या आवडीचे जेवण मिळणं हे फक्त एक स्वप्न असल्यासारखं वाटतं. पण आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे. कारण आता ट्रेनमध्ये तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करून तुमच्या आवडीचे जेवण तुमच्या सीटवर मिळेल. IRCTC ची फूड डिलिव्हरी सेवा Zoop ने वापरकर्त्यांना WhatsApp चॅटबॉट सेवा देण्यासाठी Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना फक्त PNR नंबर वापरून प्रवासात ट्रेनच्या सीटवर सहजपणे जेवण ऑर्डर करता येईल.
आता तुम्ही कोणतेही अतिरिक्त अॅप्स डाउनलोड न करता व्हॉट्सअॅपद्वारे कोणत्याही आगामी स्टेशनवर जेवण ऑर्डर करण्यासाठी Zoop वापरू शकता. व्हॉट्सअॅपवरील चॅट वापरकर्ते रिअल-टाइम फूड ट्रॅकिंग देखील करू शकतात तसेच फीडबॅक देऊ शकतात आणि त्यांच्या ऑर्डरशी संबंधित अपडेट मिळवू शकतात. ही सुविधा सुरू झाल्यानंतर वापरकर्त्यांना यापुढे ट्रेनमध्ये प्रवास करताना रेल्वे पॅंट्री किंवा इतर विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. भारतीय रेल्वेमध्ये तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे जेवण कसे ऑर्डर करू शकता हे खालील स्टेप्सच्या साय्याने जाणून घेऊ शकता. (हेही वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वे सेवेबाबत माहिती हवी आहे? बस्स! फक्त डायल करा '139' नंबर, पाहा कमाल)
WhatsApp चा वापर करून रेल्वे प्रवासी अशाप्रकारे बुक करू शकतात खाद्यपदार्थ-
- तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर मजकूर संदेश पाठवू शकता. हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता आणि जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करू शकता. तसेच Zoop सोबत चॅट सुरू करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करू शकता.
- तुमच्या फोनवर WhatsApp उघडा आणि फक्त 'हाय' टाइप करून Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.
- त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल. ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का?, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे अनेक पर्याय मिळतील.
- जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.
- यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.
- एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे अन्न जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.
- स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही तुम्हाला हवी ती डिश निवडू शकता.
एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल. तुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करू शकता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)