Gold Store at Home: सोने घरात ठेवण्यापूर्वी जाणून घ्या नियम, नाहीतर आयकर विभाग करेल कारवाई
सोने खरेदी करणे हे जवळपास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे सोने खरेदीसोबतच सोने सुरक्षीतताही एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अनेक लोक बँकेत लॉकर (Bank Locker) मिळत नसल्याने खरेदी केलेले सोने घरीच साठवण्यावर भर देतात.
सोने दिवसेंदिवस इतके महाग होत चालले आहे की, बोलायची सोय नाही. सोने खरेदी करणे हे जवळपास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे सोने खरेदीसोबतच सोने सुरक्षीतताही एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. अनेक लोक बँकेत लॉकर (Bank Locker) मिळत नसल्याने खरेदी केलेले सोने घरीच साठवण्यावर भर देतात. सोने घरी साठवून (Gold Store at Home) अथवा बाळगण्यासाठीही काही नियम आहेत. नियमांचे पालन करुन सोने घरी ठेवण्यास काहीच हरकत नाही. मात्र, नियमबाह्यपणे सोने जर साठवून ठेवले तर मात्र आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करु शकतो. सोने घरात ठेवण्यापूर्वी जाणून घ्या नियम.
सोने धातूबाबत भारत सरकार अधिक गंभीर आहे. त्यामुळे विदेशातून सोने आणण्यावर काही निर्बंध आहेत. त्यासाठी विशेष नियम आहेत. तसेच, प्रत्येक व्यक्तिकडे किती सोने असावे यासाठीही काही नियम आहेत. हे नियम व्यक्ती आणि कुटुंबालाही लागू राहतात. घरात आपण किती सोने बाळगू शकतो? या प्रश्नाचे उत्तर आहे कितीही. होय, आपण घरात कितीही तोळे, ग्रॅम, किलो अथवा टन सोने घरात साठवू शकतो. परंतू, आपल्याकडे असलेल्या सोन्याबाबत आवश्यक पुरावे असायला हवेत. म्हणजेच आपल्याकडील सोन्याचा स्त्रोत, उत्पन्नाचा स्त्रोत याशिवाय आपण हे सोने कुठून आणले, त्यासाठी आवश्यक कर भरला आहे का? यासारख्या बारीकसारीक सर्व गोष्टींचा तपशील आपल्याला आवश्यक अधिकृत संस्थांना देता यायला हवा. (हेही वाचा, Mutual Fund Investment: विदेशी कंपन्यांच्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करावी काय? घ्या जाणून)
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) धोरणानुसार तुम्ही तुमच्या घरी कितीही सोने बाळगू शकता. मात्र, तुमच्याकडे अधिक प्रमाणावर सोने असल्यास तुम्हाला आयकर विभागाला त्याचा तपशील द्यायला हवा. त्यातही जर तुमच्याकडे घरी किंवा बँक लॉकरमध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोने अथवा सोन्याचे दागीने असतील तर त्याबाबत आयकर विभागाकडे तशी नोंदणी करायला हवी.
आयकर विभागाच्या नियमानुसार घरातील विवाहीत स्त्रीला 500 ग्राम सोने सोबत बाळगता येऊ शकते. अविवाहीत स्त्री स्वत: सोबत 250 ग्रॅम सोने बाळगू शकते. तर घरातील पुरुष सोबत 100 ग्रॅम सोने सोबत बाळगू शकतात. सोने विक्रीवर भांडवली कर लावला जातो.
महत्त्वाची माहिती
सोने बाळगण्याबाबत प्राप्तिक अधिनियमात महत्तवाची तरतूद आहे. प्राप्तिकर अधिनियम 1961च्या कलम 132 अन्वये आयकर विभागाने एखाद्या व्यक्तीच्या घरावर अथवा मालमत्तांवर धाड टाकली. त्याच्याकडे काही मौल्यवान धातू अथवा धातूच्या वस्तू सापडल्या तर त्याचा आवश्यक आणि योग्य तपशील आयकर विभागाला सांगणे आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या सोन्याबाबत आवश्यक माहिती अथवा तपशील याची वास्तव माहिती आयकर विभागाला देऊ शकला नाही तर त्याच्याकडे असलेले सोने जप्त करु शकते. तसा अधिकार आयकर विभागाला आहे. यासोबतच संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेला प्राप्तिकर आणि त्याने खरेदी केलेले सोने व त्याकडे असलेले सोने यांचा एकमेकासी ताळमेळ असायला हवा. तो लागत असेल तर आयकर विभाग काहवाई करत नाही. तसेच, विशिष्ट मर्यादेच्या खाली सोने असेल तर आयकर विभाग कारवाई करु शकत नाही.