Gold-Silver Price Hike Today on January 1, 2023: सोने, चांदी खरेदी करता आहात? जाणून घ्या नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे दर

नव्या वर्षातील पहिल्या दिवशी काय करायचे याचेही आपल्यापैकी अनेकांनी ठरवले आसले. काही लोक नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने, चांदी खरेदी करण्याचाही विचार करतात. तुम्हीही हा विचार करत असाल तर इकडे लक्ष द्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने, चांदी दर (Gold-Silver Price Hike Today) किती कसे आहेत याबाबत आवश्यक माहिती आपण घेतली आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला इथे ती मदत करत आहोत.

Gold-Silver Price Hike Today on January 1, 2023: सोने, चांदी खरेदी करता आहात? जाणून घ्या नववर्षाच्या पहिल्या दिवशीचे दर
Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

Gold-Silver Price In Happy New Year 2023: नव्या वर्षाचे आगमन झाले आहे. नव्या वर्षात काय काय कराचे याचे संकल्प तर आपण केले असालच. त्याचसोबत नव्या वर्षातील पहिल्या दिवशी काय करायचे याचेही आपल्यापैकी अनेकांनी ठरवले आसले. काही लोक नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने, चांदी खरेदी करण्याचाही विचार करतात. तुम्हीही हा विचार करत असाल तर इकडे लक्ष द्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने, चांदी दर (Gold-Silver Price Hike Today) किती कसे आहेत याबाबत आवश्यक माहिती आपण घेतली आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला इथे ती मदत करत आहोत.

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या नजिकच्या शहरातील किंवा महाराष्ट्रातील आणि देशातीलही काही प्रमुख शहरांतील सोने चांदी दर इथे देत आहोत. जेणेकरुन आपल्याला सोने, चांदी खरेदी करणे सोपे जाऊ शकते. सोने हा अतिशय मौल्यवाना धातूंपैकी सर्वात अव्वल असलेला धातू आहे. त्यामुळे सहाजिकच त्याला जगभरात मोठी मागणी असते. सोने, चांदी धातूबाबत महत्त्वाचे असे की, याचे दर दररोज बदलतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरही सोने, चांदी दरात मोठे बदल होताना आढळून येतात. त्यामुळे तुम्ही जर आज सोने, चांदी खरेदी करु इच्छित असला तर जाणून घ्या आजचे दर.(हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)

भारतातील गुंतवणूकदार आणि प्रामुख्याने सर्वसामान्य लोक हे सोने खरेदीला नेहमी प्राधान्य देतात. त्यामुळे भारतात सोने दराबाबत नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. गुड रिटर्न्स वेबासाईट सोने-चांदी दर जाहीर करत असते. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार प्रति तोळा म्हणजेच 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 50,600 रुपये इतकी आहे. तर चांदी प्रति किलो 71,300 रुपये दराने विकली जात आहे. महाराष्ट्रातील आणि देशभरातील प्रमुख शहरांतील सोने, चांदी दर खालील प्रमाणे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोने चांदी दर

मुंबई

22 कॅरेट- 50,600 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 55,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

पुणे

22 कॅरेट- 50,600 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 55,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नागपूर

22 कॅरेट- 50,600 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 55,200 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

नाशिक

22 कॅरेट- 50,630 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट- 55,230 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

चांदी- 713 रुपये (प्रति 10 ग्रॅम)

दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.

भारतातील प्रमख शहरांतील प्रति 10 ग्रॅमचे चांदी दर (*सर्व दर गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार)

शहर 22 कैरट सोना

आज

24 कैरट सोना

आज

चेन्नई ₹51,300 ₹55,960
मुंबई ₹50,600 ₹55,200
नई दिल्ली ₹55,750 ₹55,350
कोलकाता ₹50,600 ₹55,200
बैंगलोर/बेंगलुरु ₹55,650 ₹55,250
हैदराबाद ₹50,600 ₹55,200
केरल ₹50,600 ₹55,200
पुणे ₹50,600 ₹55,200
बड़ौदा ₹55,650 ₹55,250
अहमदाबाद ₹55,650 ₹55,250
जयपुर ₹55,750 ₹55,350
लखनऊ ₹55,750 ₹55,350
कोयंबटूर ₹51,300 ₹55,960
मदुरै ₹51,300 ₹55,960
विजयवाड़ा ₹50,600 ₹55,200
पटना ₹55,650 ₹55,250
नागपुर ₹50,600 ₹55,200
चंडीगढ़ ₹55,750 ₹55,350
सूरत ₹55,650 ₹55,250
भूवनेश्वर ₹50,600 ₹55,200
मैंगलोर ₹55,650 ₹55,250
विशाखापत्तनम ₹50,600 ₹55,200
नासिक ₹50,630 ₹55,250
मैसूर ₹55,650 ₹55,250

वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2023 12:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).