SBI Personal Gold Loan: एसबीआयच्या 'पर्सनल गोल्ड लोन'वर मिळवा 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज; पात्रता, व्याज दर, कर्जाची रक्कम आणि प्रक्रिया शुल्क यासह महत्वाची माहिती जाणून घ्या

गोल्ड लोन घेण्यासाठी आपल्याला कोणतीही उत्पन्नाची माहिती देण्याची आवश्यकता नाही. बँका सहसा कर्ज म्हणून 75 टक्के सोन्याच्या किंमतीची ऑफर देतात.

SBI Personal Gold Loan (PC - SBI Twitter)

SBI Personal Gold Loan: अनेक लोकांना आव्हानात्मक काळामध्ये आर्थिक संकटाला सामोर जाव लागतं. अशा परिस्थित अनेकजण सामान्यत: वैयक्तिक कर्ज किंवा सुवर्ण कर्ज घेतात. गोल्ड लोन हा वैयक्तिक कर्जापेक्षा नेहमीचं चांगला पर्याय आहे. कारण, त्यावर कमी व्याज दर आहे. तसेच तुम्हाला सोन्याच्या कर्जामध्ये परतफेड लवचिक पर्याय उपलब्ध असतील.

देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ग्राहकांना पर्सनल गोल्ड लोन देते. ज्यामध्ये ग्राहक 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. हे कर्ज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना उपलब्ध आहे. विशेष म्हणजे गोल्ड लोन घेण्यासाठी आपल्याला कोणतीही उत्पन्नाची माहिती देण्याची आवश्यकता नाही. बँका सहसा कर्ज म्हणून 75 टक्के सोन्याच्या किंमतीची ऑफर देतात. (वाचा - SBI Xpress Credit Personal Loan: आता फक्त एका Missed Call किंवा SMS वर मिळेल 20 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या पात्रता व अटी)

स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच ट्वीटद्वारे गोल्ड लोन संदर्भात माहिती दिली आहे. बँकेने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्हाला व्यवसायासाठी चांगली गुंतवणूक हवी असेल, तर प्रथम एसबीआयचा विचार करा. एसबीआयवर गोल्ड लोनसाठी अर्ज करा आणि इतर 7.50% व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्क यासारख्या आकर्षक सौद्यांचा आनंद घ्या. यासाठी 7208933143 वर एक मिस कॉल द्या किंवा 7208933145 वर गोल्ड SMS पाठवा.

SBI गोल्ड लोन पात्रता निकष -

वयः 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती एसबीआयमध्ये सोन्याच्या कर्जासाठी अर्ज करू शकते.

व्यवसायः कोणतीही व्यक्ती (एकट्याने किंवा संयुक्तपणे) उत्पन्नाचा स्थिर स्रोत असलेला बँक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक कर्जासाठी अर्ज करू शकतो. यासाठी उत्पन्नाचा पुरावा दाखविण्याची गरज नाही.

कमाल कर्जाची रक्कम: 50 लाख रुपये

किमान कर्जाची रक्कम: 20,000 रुपये

मार्जिन -

गोल्ड लोन: 25 टक्के

तरल सोन्याचे कर्ज: 25 टक्के

बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन: 35 टक्के

प्रक्रिया शुल्कः कर्जाच्या 0.25 टक्के जीएसटी. योनो अॅपद्वारे अर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.

व्याज दर: एमसीएलआर (1 वर्ष) +0.50 टक्के. सध्या सोन्याच्या कर्जावरील प्रभावी व्याज दर 7.50 टक्के आहे.

परतफेडीचा कालावधी -

गोल्ड लोन: 36 महिने

लिक्विड गोल्ड लोन: 36 महिने

बुलेट रिपेमेंट गोल्ड लोन: 12 महिने

अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एसबीआयच्या गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे या कर्जासाठी ग्राहकांना आपल्या उत्पन्नाचा पुरावा दाखवण्याची आवश्यकता नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now