EPFO: दिवाळीपर्यंत मिळू शकते PF धारकांना 8.5 टक्के व्याजाची मोठी भेट; जाणून घ्या एका SMS द्वारे कसा प्राप्त कराल तुमचा Account Balance

याचा पहिला हप्ता दिवाळीपर्यंत भागधारकांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो.

EPFO (Photo Credits-Facebook)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सहा कोटी सभासदांना दोन हप्त्यांमध्ये आर्थिक वर्ष 2019-20 चे व्याज देण्याचे ठरविण्यात आले होते. याचा पहिला हप्ता दिवाळीपर्यंत भागधारकांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो. ईपीएफओला पीएफवर (PF) 8.50 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. पहिल्या हप्त्याद्वारे ते 8.15 टक्के आणि नंतर 0.35 टक्के व्याज देणार आहेत. 0.35% व्याज डिसेंबरपर्यंत जमा केले जाऊ शकते. मात्र याबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. परंतु दिवाळीच्या आसपास पीएफ शेअरधारकांना सरकारकडून भेट मिळू शकते.

कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता केंद्रीय बोर्डाने व्याज दराबाबतच्या अजेंडाचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारला 8.50% दराची शिफारस केली.

जाणून घेऊया एका मेसेजद्वारे कसा समजेल Account Balance –

द्दराम्यान, पीएफ ही एक अशी रक्कम आहे जी सर्वांसाठीच खूप उपयुक्त आहे. ही रक्कम निवृत्तीनंतर गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा इतर कामांसाठी देखील वापरली जाऊ शकते. या पैशातून मुलांचे लग्न, घर खरेदी, मुलांचे शिक्षण इत्यादी बर्‍याच ठिकाणी खर्च केले जाऊ शकते. मात्र हे पैसे निवृत्तीनंतरच काढता येणार अशी तरतूद नाही, आपण कधीही हे पैसे काढू शकता.