EPFO Cash Withdrawal: खुशखबर! आता PF खातेधारक गरज पडल्यास काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
याद्वारे कर्मचारी भविष्य सुरक्षित ठेवू शकतात किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी पीएफ खात्यात चांगले व्याजही जमा करू शकतात
आजकाल कोविडची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना पुन्हा काळजी वाटू लागली आहे की, जर कोरोना किंवा इतर कोणत्याही आजारामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागलेच आणि त्यासाठी पैसे हवेच असतील तर ते से कुठून उभे करणार. जर तुमच्या मनात अशी चिंता असेल आणि तुम्ही नोकरी करत असाल, तर केंद्र सरकारने एक सुविधा दिली आहे. आता नवीन नियमानुसार पीएफ खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातून 1 लाख रुपये काढू शकतात. ही रक्कम मेडिकल अॅडव्हान्स क्लेम अंतर्गत करता येते व ही रक्कम खातेदारांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय मिळू शकते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पीएफ खातेधारकांना अनेक सुविधा पुरविल्या जातात. याद्वारे कर्मचारी भविष्य सुरक्षित ठेवू शकतात किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी पीएफ खात्यात चांगले व्याजही जमा करू शकतात. यासोबतच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. त्याच वेळी, आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्याद्वारे आता कर्मचारी आरोग्याच्या कारणास्तव 1 लाख रुपयांची रक्कम काढू शकतात. मात्र, त्यावर दावा करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. (हेही वाचा: Post Office Scheme देतेय वर्षाला 6.6% रिटर्न; पहा कशी कराल गुंतवणूक, पात्रता निकष काय आणि महत्त्वाची माहिती)
पीएफचे पैसे काढण्यासाठी या आहेत अटी-
- व्यक्ती सरकारी रुग्णालय/CGHS पॅनेल रुग्णालयात भरती असला पाहिजे.
- खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत, रक्कम देण्याआधी पडताळणी केली जाईल.
- कामाच्या दिवशी अर्ज केल्यास, पैसे दुसऱ्या दिवशी हस्तांतरित केले जातील.
- पैसे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यावर किंवा हॉस्पिटलच्या बँक खात्यावर पाठवले जाऊ शकतात.
जाणून घ्या ईपीएफमधून पैसे कसे काढायचे-
- www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवर, वरच्या उजव्या कोपर्यात ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम वर क्लिक करा.
- तुम्हाला https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface ही लिंक उघडावी लागेल.
- त्यानंतर ऑनलाइन सेवांवर जा आणि त्यानंतर क्लेम (फॉर्म-31,19,10C आणि 10D) भरावा लागेल.
- तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक प्रविष्ट करा आणि व्हेरिफाय करा.
- पुढे Proceed for Online claim वर क्लिक करा
- ड्रॉप डाउनमधून पीएफ अॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
- त्यानंतर तुमचे कारण निवडा. आवश्यक रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता प्रविष्ट करा
- Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाइप करा
- तुमचा क्लेम सबमिट केल्यानंतर आणि तो स्वीकारल्याच्या तासाभरात पीएफ दाव्याचे पैसे येतील.
ही वैद्यकीय आगाऊ रक्कम पीएफ खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी असू शकते.