Driving Licence: आरटीओ चाचणी शिवाय ड्रायव्हिंग लायसन्स? काय आहे नियम

ती परीक्षा, आरटीओसमोर द्यावी लागणारी ती चाचणी या सारख्या अनेक गोष्टी अनेकांना अडचणीच्या वाटतात. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry Of Roads And Motorways) एक नामी निर्णय घेतला आहे.

Driving Licence | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

New RTO Rules: वाहन चालवण्याचा परवाना म्हणजेच ड्रायव्हींग लायसन्स (Driving Licence) काढणे म्हणजे अनेकांच्या दृष्टीने डोक्याला ताप. ती परीक्षा, आरटीओसमोर द्यावी लागणारी ती चाचणी या सारख्या अनेक गोष्टी अनेकांना अडचणीच्या वाटतात. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Union Ministry Of Roads And Motorways) एक नामी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसा वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त करण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे बदल 1 जुलैपासून लागू झाले आहेत. त्यानुसार ड्रायव्हींग लायसन्स (Driving Licence) मिळविण्यासाठी आता आरटीओ (RTO) कार्यालयात लांबच लांब रांगेत उभा राहण्याची मुळीच गरज नाही. याचाच अर्थ तुम्हाला गाडी न चालवताही ड्रायव्हींग लायसन्स मिळू शकते.

आरटीओऐवजी अलिकडील काळात ड्रायव्हींग ट्रेनिंग सेंटर्स महत्त्वपूर्ण होऊ लागले आहेत. या सेंटर्सना अधिक बळ देण्याचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचा विचार आहे. त्यामुळे जे लोक आता ड्रायव्हींग लायसन्स बनवू इच्छितात त्यांनी ट्रेनिंग सेंटर्समध्ये प्रशिक्षण घ्यावे त्यानंतर त्यांना एक सर्टीफिकेट मिळेल. या वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रांची वैधता पाच वर्षे इतकी असेल. त्यानंतर संबंधित केंद्रांना हा परवाना नुतनीकरण करावा लागेल. हे ट्रेनिंग सेंटर्स हे स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा केंद्र सरकारच्या अधिन असतील. (हेही वाचा, Driving Licence Renewal: घरबसल्या करा ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू; फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स)

नागरिकांना मिळणारा वाहन चालवण्याचा परवाना हा ट्रेनिंग सर्टीफिकेटच्या आधारे मिळेल. त्यासाठी आरटीओमध्ये जाऊन कोणतीही टेस्ट देण्याची अजिबात आवश्यकता नाही. या ट्रेनिंग सेंटर्समध्ये सिम्युलेटर्स लावले जातील आणि ड्रायव्हींग टेस्ट ट्रॅकही उपलब्ध असतील. या सेंटर्समध्ये लाईट मोटर व्हेईकल(Light Motor Vehicles), मीडियम आणि हेवी मोटर व्हेईकल (Medium And Heavy Vehicles) ट्रेनिंगही दिली जाईल. दरम्यान, लाईट मोटार व्हेईकलसाठी ट्रेनिंगचा कालावधी हा 29 तासांचा असेल. ज्यात एकमहिन्यामध्ये संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. या ट्रेनिंग सेंटर्समध्ये थेरी सोबतच प्रॅक्टीकल नॉलेजही दिले जाईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif