अखिल भारतीय पर्यटक वाहन नियम, 2021 च्या अधिस्वीकृतीचा मसुदा जारी
2021 मध्ये अधिसूचित केलेल्या नियमांनी पर्यटक वाहनांसाठी परवाना व्यवस्था सुव्यवस्थित आणि सोपी करून भारतातील पर्यटन क्षेत्राला लक्षणीय चालना दिली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2022 रोजी जी. एस. आर 815(E) च्या मसुद्याची अधिसूचना जारी केली असून, तो अखिल भारतीय पर्यटन वाहन (कायदेशीर परवानगी देणे किंवा परवाना) नियम, 2021 ची जागा घेईल.
2021 मध्ये अधिसूचित केलेल्या नियमांनी पर्यटक वाहनांसाठी परवाना व्यवस्था सुव्यवस्थित आणि सोपी करून भारतातील पर्यटन क्षेत्राला लक्षणीय चालना दिली आहे. आता, प्रस्तावित अखिल भारतीय पर्यटक वाहन (परवाना) नियम, 2022 मुळे पर्यटन परवाना व्यवस्था आणखी सुव्यवस्थित आणि बळकट करण्याचा प्रस्ताव आहे.
प्रस्तावित नियमांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:
- ऑल इंडिया परमिट (अखिल भारतीय परवाना) अर्जदारांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि अनुपालन ओझे कमी करण्यासाठी, कायदेशीर परवानगी आणि अखिल भारतीय प्रवासी परवान्याची तरतूद एकमेकांपासून वेगळी करण्यात आली आहे.
- कमी प्रवासी क्षमतेच्या (दहापेक्षा कमी) वाहनांसाठी कमी परवाना शुल्कासह पर्यटक वाहनांच्या अधिक श्रेणी प्रस्तावित केल्या आहेत. यामुळे कमी आसनक्षमतेची लहान वाहने असलेल्या छोट्या पर्यटन सहल आयोजकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे कारण त्यांना आता त्यांच्या वाहनांच्या आसन क्षमतेनुसार कमी शुल्क भरावे लागेल.
- इलेक्ट्रिक वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वापराला चालना देण्यासाठी सहल-आयोजकांना सुव्यवस्थित नियामक परिसंस्था निःशुल्क उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
सर्व भागधारकांकडून तीस दिवसांच्या कालावधीत अभिप्राय आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.