IPL Auction 2025 Live

Self-Declaration Form ते Check in Time पहा 25 मे पासून सुरू होणार्‍या Domestic Flights च्या प्रवासात एअरलाईन्स आणि प्रवाशांना कोणत्या गोष्टींची परवानगी आणि कशावर बंदी?

आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा Self Declaration Form ची माहिती प्रवाशांनी दिल्यानंतरच त्यांना Web Check in किंवा Tele Check In करता येईल अशी व्यवस्था करण्याचे विमान कंपन्यांना आदेश असतील.

Screening at Hyderabad International Airport (Photo Credits: ANI)

Domestic Flights Resumption: कोरोना व्हायरसशी सामना करणार्‍या भारतामध्ये आता दीड ते दोन महिने ठप्प पडलेली प्रवासी विमानसेवा येत्या 25 मे पासून भारतामध्ये देशांर्गत सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे. आज सकाळी AAI कडून प्रोटोकॉल जारी करण्यात आल्यानंतर आता Ministry of Civil Aviation कडून विमान कंपनी आणि प्रवाशांसाठी काही गाईडलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान देशांर्तगत सुरू होणार्‍या या प्रवासी वाहतूकीदरम्यान आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणं बंधनकारक असेल पण त्यासोबतच प्रवाशांना self-declaration form भरून द्यायचा आहे. ज्यामध्ये त्यांना मागील 2 महिन्यात कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. असं स्पष्ट करायचं आहे.

दरम्यान आरोग्य सेतू अ‍ॅप किंवा Self Declaration Form ची माहिती प्रवाशांनी दिल्यानंतरच त्यांना Web Check in किंवा Tele Check In करता येईल अशी व्यवस्था करण्याचे विमान कंपन्यांना आदेश असतील.

प्रवासी विमान सेवेदरम्यान प्रवाशांना कशाची मुभा असेल आणि कशावर बंदी?

इथे पहा संपूर्ण नियमावली  

दरम्यान आज सकाळी Airports Authority of India कडून प्रोटोकॉल जाहीर करताना विमान उड्डाणापूर्वी 2 तास आधी विमानतळावर पोहचणं आवश्यक आहे. त्यावेळेस प्रवाशांना फेस मास्क, हॅन्ड ग्लोव्ह घालणं आवश्यक आहे. 14 वर्षाखालील मुलं वगळता इतरांना आरोग्य सेतू वापरणं बंधनकारक असेल. गेटवरच अधिकारी त्याचं रजिस्ट्रेशन केले आहे की नाही याची तपासणी देखील करणार आहेत.

भारतामध्ये काही दिवसांपूर्वी स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोबत आता प्रवासी ट्रेनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत. सुरूवातीला 15 आणि आता 100 वेगवेगळ्या मार्गावर प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान अद्याप भारतातील कोरोना व्हायरसचा धोका टळलेला नाही. देशात 1 लाखापेक्षा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हळूहळू पण खबरदारीपूर्वक काही गोष्टींमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात झाली आहे.