Dhanteras 2021: डिजिटल गोल्ड म्हणजे काय? PhonePe, Google Pay द्वारा कशी कराल आज धनतेरस निमित्त सोने खरेदी!
डिजिटल गोल्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फिजिकल गोल्डचं डिजितल व्हर्जन आहे.
भारतामध्ये सोन्याची खरेदी आणि दिवाळीचा सण हे एक घट्ट समीकरण आहे. अनेकजण दिवाळीमध्ये धनतेरस, लक्ष्मी पूजन, दिवाळी पाडवाचा मुहूर्त साधत सोनं खरेदी करतात. यंदा सणाच्या धामधूमीत कोरोना संकटही आटोक्यात असल्याने सोनं खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची गर्दी आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणं हे भविष्याचा विचार करता नफा देणारं आहे. कोविड संकटापूर्वी अनेकजण जवळच्या किंवा ठरलेल्या सराफा दुकानातून शुभ मुहूर्तावर सोन्याचं नावं, वळं किंवा दागिने खरेदी करत असत. पण आता तुम्ही कोविड 19 काळात तुम्ही सुरक्षित राहून सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर डिजिटल गोल्ड हा चांगला पर्याय आहे. नक्की वाचा: Dhanteras Shubh Muhurat 2021: धनतेरस दिवशी सोन्या-चांदीची खरेदी, पूजा ते यमदीपदानाचा मुहूर्त, विधी पहा इथे.
डिजिटल गोल्ड हा पर्याय PhonePe आणि Google Pay सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मने आणला आहे. डिजिटल गोल्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून फिजिकल गोल्डचं डिजितल व्हर्जन आहे. हे तुम्हांला तुमच्या आर्थिक क्षमतेनुसार घेता येऊ शकतं. म्हणजे अगदी 1 रूपयापासून पुढे कितीही. फिजिकल गोल्ड पेक्षा ते स्वस्त आहे आणि कधीही विकता येऊ शकतं. मग आज धनतेरसचा मुहूर्त साधत तुम्हांला काही सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर पहा डिजिटल गोल्डचा हा पर्याय कसा निवडाल?
गूगल पे वर डिजिटल गोल्ड कसं विकत घ्याल?
- गूगल पे ओपन करा आणि तुमच्या बॅंक खात्यासोबत ते लिंक करा.
- थोडं खाली स्क्रोल करून 'Businesses and Bills' चा पर्याय निवडा.
- तिथेच तुम्हांला गोल्डचा पर्याय दिसेल.
- पुढे तुम्हांला 'Buy Gold', 'Sell', 'Delivery' असे अनेक पर्याय दिसू शकतील.
- 'Buy Gold' पर्यायावर क्लिक केल्यानंतर Rs 201, Rs 501 आणि Rs 1,001 असे तीन पर्यायदिसतील.
- तुम्हांला ज्या किंमतीचं सोनं खरेदी करायचं आहे ती किंमत टाका आणि युपीआय पिन टाकून पुढे जा.
फोन पे वर डिजिटल गोल्ड कसं विकत घ्याल?
- PhonePe app ओपन करून तुमच्या बॅंक अकाऊंट सोबत लिंक करा.
- थोडं स्क्रोल डाऊन करून 'Investments' चा पर्याय शोधा. त्यामध्येच खाली 'Buy 24K Gold' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर ग्रॅम नुसार किंमत किती हे पाहून शकाल.
- 'Invest in Gold' चा पर्याय निवडा. आणि तुम्हांला किती सोनं खरेदी करायचं आहे हे निवडा.
- युपीआय पिन टाकून तुम्हांला पेमेंट करता येईल.
डिजिटल गोल्ड खरेदी करण्यासाठी मोबाईल वॉलेट प्लॅटफॉर्म प्रमाणेच स्टॉक होल्डिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया (Stock Holding Corporation of India) द्वारे देखील 'गोल्डरश च्या माध्यमातून सोनं घेता येऊ शकतं. ' हे दोन्हीही पर्याय MMTC - PAMP यासोबत उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ग्राहक Kuvera, Groww आणि इतर माध्यमातूही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करु शकतात.