Bitcoin: बिटकॉइन, प्रत्यक्षात नसलेले पण अस्तित्वात असलेले चलन, 'या' 5 देशांत Cryptocurrency आहे अधिकृत, मार्केटमध्ये होतात मोठमोठे व्यवहार, घ्या जाणून

भारतात बिटकॉइन अधिकृत नाही. बिटकॉइनबाबत भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बिटकॉइनला भारत सरकार जबाबदार राहणार नसल्याचे तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनीच स्पष्ट केले होते.

Cryptocurrency | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

बिटकॉईन (Bitcoin). जगभर प्रसिद्ध परंतू, अनेक देशांमध्ये बदनाम किंवा संशयास्पद असलेले एक चलन. बिटकॉईन स्थापनेपासूनच नेहमी चर्चेत आणि व्यवहारांमध्येही अव्वल राहिले आहे. असे असले तरी इतकी वर्षे लोटूनही या चलनाला अधिकृततेसाठी पाय रोऊन उभा राहता आले नाही. अधिकृततेसाठी सुरु असलेला या चलनाचा संघर्ष आजही सुरु आहे. क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) प्रकारात मोडणारे हे डिजिटल चलन जगभरातील अवघ्या काही देशांमध्येच अधिकृत मान्यता मिळवू शकले आहे. या लेखात बिटकॉइनला अधिकृत दर्जा दिलेले 5 प्रमुख देश आणि अधिकृत दर्जा न दिलेलेही 5 प्रमुख देश पाहणार आहोत.

बिटकॉईन अधिकृत असलेले 5 महत्त्वाचे देश

जपान ( Japan), यूएस (The United States), दक्षिण कोरिया (South Korea), जर्मनी (Germany), ऑस्ट्रेलिया (Australia) या देशांमध्ये बिटकॉइन हे एक प्रमुख चलन म्हणून अधिकृतरित्या मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे आपण जर यापैकी कोणत्याही देशाचे असाल तर आपण बीटीसी फास्ट प्रॉफिट (BTC Fast Profit) द्वारे बिटकॉइन वापरू आणि व्यापार करू शकता. व्यवाहारांसाठी या देशात हा एक विश्वासार्ह क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. जो बिटकॉइन व्यतिरिक्त एकाधिक क्रिप्टोकरन्सीस (Cryptocurrencies ) समर्थन देतो. (हेही वाचा, Bitcoin: बिटकॉइन म्हणजे काय? कशी होते गुंतवणूक? कशी वाढते पैशांची किंमत?)

जपान ( Japan)

बिटकॉईन ही क्रिप्टोकरन्सी स्वीकारलेला जपान हा पहिला देश आहे. बिटकॉईनचा निर्माता किंवा संस्थापकच मुळी जपानी असल्याचे मानले जाते. जपानी राष्ट्रीय चलनात बिटकॉइनचा बाजार हिस्सा सर्वाधिक आहे. म्हणजे इतका की, जपानच्या एकूण बाजारपेठेतील 60% पेक्षा जास्त व्यवहार बिटकॉईनद्वारे केले जाता असा दावा करण्यात येतो. बिटकॉइनसाठी जपान सरकारने विशेष नियमन विकसित केलेले आहे. चीनने बिटकॉइनवर बंदी (2017) घातल्यापासून जपानमध्ये या चलनाने अधिक मार्केट व्यापले आहे.  (हेही वाचा, क्रिप्टोकरन्सीवरील बंदी उठवण्याचे सर्वोच्च न्यायालयचे आदेश)

Bitcoin | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

युनायटेड स्टेस्ट (United States)

बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी स्वीकारणारे जपान नंतरचे दुसरे राष्ट्र म्हणजे अमेरिका (US) . अमेरिकेचे अधिकृत चलन डॉलर आहे. अमेरिकेसह जगभरात डॉलरमध्ये व्यवहार होतात. परंतू, बिटकॉइननेही इथे मोठी बाजारपेठ व्यापली आहे. अमेरिकेच्या बाजारेपेठेतील डॉलरच्या तुनेत 25% पेक्षा जास्त बाराजपेठ बिटकॉइनने व्यापली आहे. आपण यूएसए मध्ये बर्‍याच ठिकाणी वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता. शिवाय, जगातील सर्वात भक्कम अर्थव्यवस्थेत अनेक बिटकॉइन-आधारित कंपन्या स्थापन केल्या जातात. याशिवाय बिटकॉइन चलन वापरून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्या अनेक कंपन्याही इथे भक्कम पाय रोऊन उभ्या राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. (हेही वाचा, देशातील पहिल्या बिटकॉइन 'एटीएम'ला टाळा; संचालकाची पाठवणी तुरुंगात)

दक्षिण कोरिया (South Korea)

दक्षिण कोरिया हा बिटकॉइनचा वापर कायदेशीर असणाऱ्या देशांपैकी एक आहे. या देशात बिटकॉइन आणि इतर वेल्कोइन्स व्यापार करणे आणि गुंतवणूक करणे कायदेशीर आहे.

Bitcoin | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जर्मनी (Germany)

बिटकॉईन वापराबाबत जर्मनीच्या सरकारने म्हटले आहे की, 'बिटकॉइन वापरण्यास जर्मनी सरकार अधिकृत मान्यता देत नाही. परंतू, त्याचा समांतर चलन म्हणून वापर करता येऊ शकतो. जर्मन सरकारने त्यांच्या नागरिकांना बिटकॉईन वापरुन व्यवाहर करण्यास मान्यता दिली आहे. जर्मनीच्या राजधानीमध्येही बिटकॉइन वापरुन मोठ्या प्रमाणावर व्यवहार होतात.' (हेही वाचा, Cryptocurrency: कंपनीच्या CEO चे निधन, पासवर्ड माहित नसल्याने गुंतवणूकदारांचे १३०० कोटी Bitcoin अडकले)

ऑस्ट्रेलिया (Australia)

ऑस्ट्रेलिया देशामध्ये साधारण 2017 पासून बिटकॉइन हा अधिकृतपणे स्वीकारण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने अधिकृतपणे म्हटले आहे की, बिटकॉइन हा एक मालमत्ता म्हणून समजण्यात येईल. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने असेही मह्टले आहे की,बिटकॉइन हा Capital Gains Tax च्या अधिन राहिल.

Bitcoin | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दरम्यान, एका बाजूला काही देशांनी बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीला अधिकृत मान्यता दिली असतानाच दुसऱ्या बाजूला बिटकॉइ अधिकृत माणणारे देशही आहेत. भारतात बिटकॉइन अधिकृत नाही. बिटकॉइनबाबत भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बिटकॉइनला भारत सरकार जबाबदार राहणार नसल्याचे तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांनीच स्पष्ट केले होते. दरम्यान, भारतासह चीन (China ), बोलिव्हिया (Bolivia), कोलंबिया (Colombia), रशिया (Russia), व्हिएतनाम (Vietnam) आदी राष्ट्रांनीही बिटकॉइन अधिकृत मानण्यास नकार दिला आहे.