अबब! देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना मिळतो इतका पगार; मिळणाऱ्या सुविधा पाहून डोळे होतील पांढरे

मंत्रिमंडळात नवे सदस्य आणि खासदारांची (MP) वर्णी लागेल मात्र तुम्हाला माहित आहे की संसदेमध्ये बसणाऱ्या या लोकांना किती वेतन मिळते? राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदार अशा देश चालवणाऱ्या लोकांना त्यांच्या वेतनासोबत इतर अनेक सुविधा, सवलती मिळतात

भारतीय संसद -प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

लोकसभा निवडणूक 2019 चे धक्कादायक निकाल (Lok Sabha Election 2019 Results) हाती आले आहेत. लवकरच नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. उद्या, 30 मे रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची (Prime Minister) शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळात नवे सदस्य आणि खासदारांची (MP) वर्णी लागेल मात्र तुम्हाला माहित आहे या संसदेमध्ये बसणाऱ्या या लोकांना किती वेतन मिळते? राष्ट्रपती, पंतप्रधान आणि खासदार अशा देश चालवणाऱ्या लोकांना त्यांच्या वेतनासोबत इतर अनेक सुविधा, सवलती मिळतात आज आम्ही आपणास याबद्दल सांगणार आहोत

राष्ट्रपतींच्या वेतनापेक्षा त्यांचे घरच अधिक भव्य -

देशाच्या राष्ट्रपतींना 5 लाख रुपये प्रति महिना वेतन दिले जाते. जानेवारी 2016 मध्ये ते 1.5 लाख रुपयांनी वाढून 5 लाख झाले. शिवाय त्यांना राहण्यासाठी देशातील सर्वात मोठा राष्ट्रपती आवास दिला जातो. हा राष्ट्रपती आवास राजधानी दिल्ली येथे 5 एकर क्षेत्रात पसरला आहे. राष्ट्रपतींच्या जवळ 25 कारचा एक ताफा असतो. या ताफ्याच्या मध्यभागी त्यांची कार चालते. जेव्हा प्रणब मुखर्जी हे राष्ट्रपती होते तेव्हा त्यांच्यासाठी मर्सिडीज बेंज एस 600 वापरण्यात आली होती. राष्ट्रपती भवनच्या डागडुजीसाठी वार्षिक 30 कोटी रुपये इतके बजेट ठेवले जाते.

राष्ट्रपतीनंतर उपराष्ट्रपति, राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीश -

भारताच्या उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख रुपये प्रति महिना आहे. त्याशिवाय त्यांनाही इतर सुविधा मिळतात. राज्य सरकारच्या गव्हर्नर्सला 3 लाख 50 हजार रुपये वेतन आणि सुविधा मिळतात. भारताच्या मुख्य न्यायाधीशांना 2 लाख 80 हजार रुपये वेतन आणि काही सुविधा दिल्या जातात.

पंतप्रधानांचा थाटच वेगळा; मिळते प्रायवेट जेट -

भारताच्या पंतप्रधानांचे वेतन 1.60 लाख रुपये प्रति महिना आहे. 2012 मध्ये सादर करण्यात आलेल्या एका आरटीआयमध्ये हा खुलासा झाला. त्यात सांगितले होते की, पंतप्रधान मनमोहन सिंह यांचा बेसिक पगार 50,000 प्रति महिना आहे. त्यांना मिळणारे इतर भत्ते मिळून हा पगार 1.60 इतका होतो.

पंतप्रधानांना नवी दिल्ली 7, लोककल्याण मार्ग येथील बंगाला, व्यक्तिगत कर्मचारी, विशेष सुरक्षा असलेली लिमोझिन कार, एसपीजी सुरक्षा, एक खास जेट आणि इतर अनेक सुविधा मिळतात. निवडणुक आयोगाकडे दाखल केलेल्या एफिडेव्हिटनुसार नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक संपती 2.5 कोटी इतकी आहे. शिवाय गुजरातच्या गांधीनगर येथे त्यांच्या नावावर एक प्लॉट आहे. पंतप्रधानांना रिटायर झाल्यानंतर 20,000 रु. प्रति महिना पेंशन मिळते. तसेच दिल्लीत बंगला, एक पीए आणि एक नोकरही त्यांना दिला जातो. (हेही वाचा: नवे सरकार सत्तेत आल्यावर 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार, मिळणार ज्यादा भत्ते)

माजी पंतप्रधान रेल्वेने कितीही मोफत प्रवास करू शकतात. शिवाय त्यांना व त्यांच्या कुटुंबाला दरवर्षी 6 एक्झिक्युटिव्ह क्लासची विमानाची तिकिट मोफत मिळतात. माजी पंतप्रधानांना पुढील 5 वर्षा पर्यंत ऑफिसच्या सर्व खर्चांची परतफेडही दिली जाते, त्यानंतर 6,000 रुपये प्रति वर्ष ऑफिसचा खर्च म्हणून दिला जातो.

2018 मध्ये झाली खासदारांच्या पगारात वाढ -

सध्या खासदारांना 1 लाख रुपये बेसिक पगार मिळतो. तेलंगाना राज्यातील आमदारांना सर्वात जास्त म्हणजे 2.5 लाख रुपये प्रति महिना पगार दिला जातो. त्यानंतर दिल्ली – 2 लाख, उत्तर प्रदेश -1.87 लाख, महाराष्ट्र - 1.70 लाख, जम्मू-काश्मीर -1.60 लाख रुपये प्रति महिना पगार मिळतो.