February 2021: 1 फेब्रुवारी पासून होणार 'हे' मोठे बदल; जाणून घ्या तुमच्या जीवनावर कसा परिणाम होणार

1 फेब्रुवारीला सर्वात मोठा बदल म्हणजे बजेट. या दिवशी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या बजेटमध्ये सर्वसामान्य तसेच सर्वांच्या जीवनावर परिणाम होणारे निर्णय घेतले जाऊ शकतात.

Changes from February 1 (PC- PTI and Pixabay)

February 2021: 1 फेब्रुवारी 2021 पासून बरेच मोठे बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशातही पडणार आहे. अर्थसंकल्प सादरीकरणानंतर गॅस सिलिंडरचे दर, एटीएममधून रोख पैसे काढण्याचे नियम यासारखे सर्व बदल लागू केले जातील. हे बदल कसे कार्य करतील आणि त्याचा आपल्या जीवनावर किती परिणाम होईल हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाईल -

1 फेब्रुवारीला सर्वात मोठा बदल म्हणजे बजेट. या दिवशी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. या बजेटमध्ये सर्वसामान्य तसेच सर्वांच्या जीवनावर परिणाम होणारे निर्णय घेतले जाऊ शकतात. पगारदार वर्गाला करात सूट मिळू शकते. तसेच व्यापाऱ्यांना सवलत मिळू शकते. या अर्थसंकल्पात काही वस्तू महाग होतील तर काही वस्तूंवर कर कमी केला जाऊ शकतो. (वाचा - Ration Card मध्ये घरबसल्या मोबाईल नंबर, पत्ता कसा कराल अपडेट)

1 फेब्रुवारीपासून 'या' एटीएममधून रोख रक्कम काढता येणार नाही -

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) एटीएममधून रोकड काढून घेण्याच्या नियमात बदल करणार आहे. देशातील वाढत्या एटीएम फसवणुकीला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. वास्तविक, 1 फेब्रुवारी रोजी पीएनबी बँकेच्या ग्राहकांना ईएमव्ही नसलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार नाहीत.

1 फेब्रुवारीला सिलिंडरच्या किंमती बदलणार -

1 फेब्रुवारीपासून सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये डिसेंबरमध्ये सिलिंडर्सच्या किंमतीत अनेक वेळा वाढ झाली. आता फेब्रुवारीत तेल कंपन्या सिलिंडरच्या किंमती वाढवू शकतात. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडर आणि कमर्शियल सिलिंडरच्या किंमती ठरवतात.

एअर इंडिया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार -

एअर इंडिया आणि Air India Express ने नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे जाहीर सुरू करण्याची घोषणा केली आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस फेब्रुवारी ते 27 मार्च 2021 दरम्यान त्रिची आणि सिंगापूर दरम्यान दररोज उड्डाणे सुरू करेल. या मार्गावर कुवैत ते विजयवाडा, हैदराबाद, मंगलोर, त्रिची, कोझिकोड, कुन्नूर आणि कोची ठिकाण असतील. यापूर्वी एअर इंडिया एक्सप्रेसने जानेवारीपासून अनेक उड्डाणे सुरू केली आहेत.

पीएमसी बँकेसाठी 1 फेब्रुवारी पर्यंत ऑफर -

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या प्रशासकाने बँकेला पुन्हा उभे करण्यासाठी 1 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूकदारांना आपली ऑफर देण्याची अंतिम मुदत दिली आहे. Centrum Group-BharatPe यासारख्या काही गुंतवणूकदारांनी एकत्रितपणे ही ऑफर दिली आहे. ब्रिटेनस्थित कंपनी लिबर्टी ग्रुपनेही आपली ऑफर सादर केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now