Ration Card मध्ये घरबसल्या मोबाईल नंबर, पत्ता कसा कराल अपडेट
महाराष्ट्र सरकारचा केशरी रेशनाकार्ड धारकांना दिलासा (Photo Credits- Facebook)

केंद्र सरकारने कोरोना वायरस लॉकडाऊनच्या काळात 'वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card) योजना लागू करत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान सरकारच्या योजनांचा लाभ उठवण्यासाठी लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर रेशन कार्ड सोबत लिंक असणं आवश्यक आहे. तसेच काही सुविधांसाठी आधारकार्ड देखील लिंक करणं बंधनकारक आहे. मग जर तुम्हाला रेशन दुकानातून माफक दरात धान्य आणि सरकारच्या इतर योजनांचा फायदा हवा असेल तर आजच तुमच्या घरातील सदस्यांचे डिटेल्स अपडेट केलेत का? हे तपासा आणि जर सदस्य नोंदणी राहिली असेल तर ती घरबसल्या करून घेण्याची देखील सोय आहे. मग पहा नेमके हे बदल कसे कराल? (नक्की वाचा:  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना रेशनकार्ड सोबत आधार आणि मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ)

रेशनकार्ड सोबतच ऑनलाईन पत्ता, मोबाईल कसा लिंक कराल?

www.pdsportal.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.

त्यानंतर तुम्ही राहत असलेल्या राज्यांचं नाव यादीमधून निवडा.

पुढे तुम्हांला जिल्हा, ब्लॉक, पंचायत निवडून यादी पाहता यईल.

तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर साईन अप करून आयडी बनवावा लागेल. त्यानंतर तुम्हांला डिटेल्स अपडेट करता येतील.

मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी

रेशन कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx ला भेट द्या.

यामध्ये तुम्हांला घरातील प्रमुखाचं नाव, आधार क्रमांक, रेशन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर विचारला जाईल. ते अपडेट्स भरून नवा मोबाईल नंबर लिंक करू शकाल.

लॉकडाऊन दरम्यान मजूर, कामगारांचे काम अचानक बंद झाल्याने अनेकांना फटका बसला होता. तेव्हापासून दारिद्र रेषेखाली असलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला देशात कुठल्याही रेशन दुकानावरून अन्न धान्य माफक दरात उपलब्ध करून दिला जात आहे.