BSF Recruitment 2022: बीएसएफमध्ये बंपर भरती, 800 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या किती असेल पगार

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

BSF Recruitment 2022: सीमा सुरक्षा दल (BSF Recruitment 2022) ने अनेक पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. सरकारी नोकरी (Government Jobs) शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे एकूण 800 पदांची भरती केली जाणार आहे.

पात्रता आणि वयोमर्यादा -

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील लोकांना वयात सवलत दिली जाईल. तसेच काही महत्त्वाची कागदपत्रेही लागतील. (वाचा - SBI Recruitment 2022: एसबीआय मध्ये 48 पदांवर होतेय Assistant Managers पदांवर नोकरभरती; 25 फेब्रुवारी पर्यंत sbi.co.in वर करा अर्ज)

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे -

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 10 वी- 12 वी मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, जातीचा दाखला, पत्ता पुरावा, आधार कार्ड, NCC प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज -