Traffic Rules Changed: दुचाकीस्वारांनो सावधान! वाहतुकीचे नियम बदलले; उल्लंघन केल्यास भरावा लागणार दंड
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आजपासून नवा नियम लागू होणार आहे.
Traffic Rules Changed: सप्टेंबर महिना सुरू झाला असून त्यासोबतच वाहतूक नियमांमध्ये बदल (Traffic Rules Changed) करण्यात आला आहे. जर तुमच्याकडे दुचाकी असेल आणि तुम्ही दररोज घरातून ऑफिसला जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आता स्कूटर किंवा बाईक चालवताना तुमच्या मागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट (Helmet) घालावे लागणार आहे. होय, मोटार वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), दुचाकीस्वाराला हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
आज उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी वाहतूक नियमांवर सुनावणी घेतली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये आजपासून नवा नियम लागू होणार आहे. आता दुचाकी चालवताना दुचाकीस्वाराला हेल्मेट घालावे लागणार आहे. शहरातील वाढते अपघात पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा - 1.36 Lakh Fine For Traffic Rules Break: बेंगळुरूमध्ये ट्रॅफिकचे नियम मोडणे महिलेला पडले महागात; 270 वेळा उल्लंघन केल्याबद्दल ठोठावला 1.36 लाख रुपयांचा दंड)
नियम मोडणाऱ्यांना भरावे लागणार 1035 रुपयांचे चलन -
या नियमांचे उल्लंघन केल्यास 1035 रुपयांचे चलन कापले जाईल, अशी माहिती विशाखापट्टणम पोलिसांनी दिली आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांचा परवाना पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. तसेच, केवळ आयएसआय चिन्हांकित हेल्मेट घालणे बंधनकारक असणार आहे. तथापी, या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. (हेही वाचा - A Drunk Man Obeys Traffic Rules: मद्यधुंद व्यक्तीने पायी चालतानाही केले वाहतूक नियमांचे पालन; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट (Watch Video))
या शहरातील नियमातही होणार बदल -
आंध्र प्रदेश सोबतच मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरांमध्ये बाईक चालवणाऱ्यांसाठी हेल्मेट घालण्याचा नियम कडकपणे लागू केला जाऊ शकतो.