ATM Transaction Charges 1st August: एटीएम मधून पैसे काढताय? मग हे वाचाच, 1 ऑगस्टपासून बदलणार बरंच काही; 'पगार ते पेन्शन' जाणून घ्या 'हे' नवे नियम

सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून आणखी काही बदलांचा समावेश आहे. हे बदल 'कुछ खट्टा कुछ मीठा' अशा संमिश्र स्वरुपाचे आहेत. 1ऑगस्टपासून (Rules Changes August 1) होणाऱ्या बदलांमध्ये सरकारी सुट्टीचे कारण देऊन थांबणारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन (Pension) अथवा सेवेतील कर्मचाऱ्यांचा पगार (Salary) थांबणार नाही.

ATM Transaction | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्ट पासून आणखी काही बदलांचा समावेश आहे. हे बदल 'कुछ खट्टा कुछ मीठा' अशा संमिश्र स्वरुपाचे आहेत. 1ऑगस्टपासून (Rules Changes August 1) होणाऱ्या बदलांमध्ये सरकारी सुट्टीचे कारण देऊन थांबणारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन (Pension) अथवा सेवेतील कर्मचाऱ्यांचा पगार (Salary) थांबणार नाही. म्हणजेच आता महिन्याची 30,31 तारिख असो की शनिवार, रविवार काही फरक पडणार नाही. सुट्टीच्या दिवशीही पगाराचे पैसे खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्यांसाठी त्रासदायक बातमी म्हणजे 1 ऑगस्टपासून एटीएमधून काढल्या जाणाऱ्या पैशांवर (Cash Withdrawal) ग्राहकांना अधिकचा अधिभार (ATM Transaction Charges) द्यावा लागणार आहे. ज्याचा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पाठिमागच्या (जून) महिन्यातच घोषणा केली होती की, नेशमल ऑटोमेटेड क्लियरिंग हाउस (NACH) च्या सेवा आठवड्यातील प्रतिदिन सुरु राहव्यात. NACH ही एक प्रणाली आहे. जिचे संचलन नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. ही व्यवस्था लाभांश, व्याज, पगार आणि निवृत्तीवेतन ट्रान्सफर करण्याचे काम पाहते. ही व्यवस्था आणि प्रणाली गॅस, वीज, टेलीफोन, पाणी यांसारख्या पैशाचेही कलेक्शन करते. तसेच, कर्जाचे हप्ते (Loan EMI) , म्युच्युअल फंड आणि विम्याचे हप्ते (Mutual Funds and Insurance Premium) एकत्र करण्याचेही काम करते. (हेही वाचा, Aadhaar Letter, eAadhaar, mAadhaar आणि Aadhaar PVC Card मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या)

एटीएममधून काढण्यात येणाऱ्या पैशांसाठी ATM cash withdrawal) ग्राहकांना आता 1 ऑगस्टपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण एटीएमच्या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बॅंकेत होणारी देवाणघेवाण शुल्क आरबीआयने वाढवले आहे. ही वाढ 15 रुपयांवरुन 17 रुपये इतकी करण्यात आली आहे. आरबीआयने हा निर्णय जूनमध्ये घेतला होता. जो उद्या म्हणजेच 1 ऑगस्टपासून लागू केला जात आहे. विना आर्थिक देवाणघेवाणवरचेही शुल्क वाढवून ते 5 वरुन 6 रुपये इतके करण्यात आले आहे. इंटरचार्जेस शुल्क किणत्याही बँक खातेधारकाद्वारे त्याला मिळालेल्या एटीएम कार्ड (ATM card) दुसऱ्या एटीएमचा वापर करुन पैसे काढल्यास लागते.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) नेही त्यांच्या डोरस्टेप डिलिव्हरी सेवा (doorstep services) शुल्कात वाढ केली आहे. पोस्ट पेमेंटच्या बँका आता प्रत्येकवेळी या सेवांसाठी 20 रुपये (जीएसटी अतिरिक्त) घेणार आहे. दरम्यान, डोरस्टेप सर्विससाठी जेव्हा पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank) चा कर्मचारी जेव्हा घरी येई तेव्हा ग्राहक अनेक वेळा देवाणघेवाण करु शकतो. परंतू, त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क मात्र एकाच वेळी भरावे लागेल. परंतू, एकाच जागेवरचा ग्राहक वेगवेगळ्या सेवेचा लाभ घेत असेल तर त्यासाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागेल.

दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने स्थानिक बचत खातेधारकांना एटीएम देवाणघेवाण शुल्क आणि चेक बुक चार्ज (Cheque Book Charges) 1 ऑगस्टपासून वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक डिपॉझिट आणि पैसे काढणे यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे. ICICI बँकेच्या नव्या नियमांननसार प्रति महिना आता केवळ चार वेळाच एटीएम व्यवहार मोफत (ATM Free Transactions) होतील. बँकच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार चार पेक्षा अधिक वेळा रक्कम काढल्यास 150 रुपये इतके शुल्क भरावे लागू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now