Online Payment करण्यासाठी आता ATM PIN आवश्यक नाही, केवळ OTP वापरुन होणार काम, फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे आदेश

आरबीआयने इकॉमर्स कंपन्यांनाही आदेश दिले आहेत की, ऑर्डर रद्द झाल्यावर किंवा इतर कोणत्या प्रकरणात रिफंड केले जाणारे पैसे ग्राहकाच्या खात्यात किंवा क्रेडीट कार्डवरच जमा केले जावेत. ते पैसे ज्याच्या माध्यमातून जमा केले गेले त्याच माध्यमातून परतही केले जावेत असेही आरबीआयने म्हटले आहे.

Online Payment | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ऑनलाईन पेमेंट (Digital Payments) करणाऱ्या मंडळींसाठी आता आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. यापुढे तुम्हाल ऑनलाईन पेमंट करत असताना एटीएम पीन (ATM PIN) टाकण्याची गरज नाही. केवळ ओटीपी (OTP) वापरुन तुम्ही पेमेंट करु शकतात. ऑनलाईन पेमेंट करत असताना होत असलेली अफरातफर टाळण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारे ही ऑनलाइन पेमेंट अॅग्रिगेटर्स आणि पेमेंट गेटवे कंपन्यांना या सूचना करण्यात आल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की, ऑनलाईन ट्रांजेक्शन करण्यासाठी एटीएम पीन टाकण्याचा पर्याय बंद करण्यात यावा. त्या ऐवजी OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड व्यवस्था सुरु करण्यात यावी.

ऑनलाइन पेमेंट गेटवे कंपन्यांसारखी Razorpay आणि CC Avenue यांना दिलेल्या निर्देशांमध्ये हे सांगण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, आता 2,000 रुपयांपेक्षा अधिक कोणतेही ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यासाठी वन टाइम पासवर्ड आवश्यक आहे. दरम्यान, केंद्री बँकेचे म्हणने असे की, एटीएम पिन पर्यायाच्या माध्यमातून फसवणूक, अफरातफ होण्याची शक्यता असते. त्यामुळे वन टाइम पासवर्ड केव्हाही अधिक सुरक्षीत पर्याय ठरतो. ज्यामध्ये फसवणुकीच्या घटना कमी होण्याची शक्यात असते.

आरबीआयने इकॉमर्स कंपन्यांनाही आदेश दिले आहेत की, ऑर्डर रद्द झाल्यावर किंवा इतर कोणत्या प्रकरणात रिफंड केले जाणारे पैसे ग्राहकाच्या खात्यात किंवा क्रेडीट कार्डवरच जमा केले जावेत. ते पैसे ज्याच्या माध्यमातून जमा केले गेले त्याच माध्यमातून परतही केले जावेत असेही आरबीआयने म्हटले आहे. काही कंपन्या रिफंड करताना त्यांच्या बँक खात्याऐवजी ई-वॉलिट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आरबीआयने या सूचना केल्या आहेत. (हेही वाचा, 31 मार्च 2020 पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास होणार रद्द, आयकर विभागाचा 17 कोटी नागरिकांना इशारा)

आरबीआय नेटीफिकेशननुसार सांगायचे तर, पेमेंट एग्रिगेटर्सकडून ग्राहकांना एटीएम पिन मागितला जाऊ शकत नाही. त्याशिवाय पेमेंट अग्रिगेटर्स ला ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी नेड अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही आदेश आरबीआयने दिले आहेत. याशिवाय वेबसाइट, मोबाईल अॅप यांवरही तक्रार नोंदविण्याची सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now