PNG-CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलनंतर आता पीएनजी-सीएनजीच्या किंमतीतही वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर?
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी 1 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत आजपासून CNG ची नवीन किंमत 59.01 रुपये प्रति किलो झाली आहे.
PNG-CNG Price Hike: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price), एलपीजी (LPG) च्या दरात वाढ झाली. तसेच आता सीएनजी-पीएनजी (CNG-PNG) साठीही लोकांच्या खिशाला झळ लागणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत आजपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (Indraprastha Gas Limited (IGL)) ने केली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात एकावेळी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
तसेच आता घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरातही वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पीएनजीचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दरही पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. केवळ स्वयंपाकासाठी लागणारे एलपीजी सिलिंडरचं नव्हे तर पाईपमधून येणारा एलपीजीही महाग झाला आहे. त्याचबरोबर सीएनजीच्या दरातही आजपासून प्रति किलो 1 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी 1 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत आजपासून CNG ची नवीन किंमत 59.01 रुपये प्रति किलो झाली आहे. नोएडा-ग्रेटर नोएडा-गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 61.58 रुपये झाली आहे, तर गुरुग्राममध्ये सीएनजीचा नवीन दर 67.37 रुपये प्रति किलो झाला आहे. (हेही वाचा - Nationwide Bank Strike: आजच उरका बॅंकेची काम; 28-29 मार्चला बॅंकांचा संप, सलग 4 दिवस बंद राहणार बॅंका)
दिल्लीसह इतर शहरांमध्ये नवीनतम CNG च्या किंमती -
- दिल्ली- 59.01 प्रति किलो
- नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद - 61.58 रुपये प्रति किलो
- मुझफ्फरनगर, मेरठ, शामली - 66.26 रुपये प्रति किलो
- गुरुग्राम - 67.37 रुपये प्रति किलो
- रेवाडी - 69.48 रुपये प्रति किलो
- कर्नाल, कैथल - 67.68 रुपये प्रति किलो
- कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर - 70.82 रुपये प्रति किलो
- अजमेर, पाली आणि राजसमंद - 69.31 रुपये प्रति किलो
PNG किंमत वाढ -
ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात असे लिहिले आहे, इनपुट गॅसच्या किमतीतील वाढ अंशतः कव्हर करण्यासाठी घरगुती पीएनजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. 24 मार्चपासून प्रति SCM 1.00 वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये लागू किंमत 36.61/SCM (व्हॅटसह) असेल. या दरवाढीपूर्वी, दिल्लीतील देशांतर्गत पीएनजीची किंमत 35.61 रुपये प्रति एससीएम होती. पीएनजीच्या दरात या वर्षी जानेवारीत शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने पीएनजीच्या किमती 50 पैशांनी वाढवल्या होत्या.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती -
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 137 दिवसांनंतर मंगळवारी म्हणजेच 22 मार्च रोजी 80 पैशांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर बुधवारीही दरात वाढ झाली. मात्र, आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आलेला नाही.