7th Pay Commission Latest News: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या किती वाढेल तुमचा पगार

एका अहवालानुसार, केंद्र लवकरच डीएमध्ये आणखी 3 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते.

Representational Image (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारने नुकतेच 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay Commission) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता किंवा डीए (Dearness Allowance) 28 टक्के केला आहे. एका अहवालानुसार, केंद्र लवकरच डीएमध्ये आणखी 3 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. तसे झाल्यास केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के महागाई भत्ता मिळेल. याचा अर्थ, कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात वाढ होईल. कर्मचाऱ्यांना जुलैपासून 28 टक्के डीए मिळणार आहे व तो सप्टेंबरच्या पगारासोबत मिळेल. यादम्यान, जून 2021 साठी महागाई भत्ता वाढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे आणि तो आणखी 3 टक्क्यांनी वाढवण्याची तयारी सुरु आहे.

सरकार साधारणपणे दरवर्षी दोनदा डीए दर वाढवते- जानेवारी आणि जुलैमध्ये. डीए दरात शेवटची 4 टक्के वाढ या वर्षी जानेवारीत जाहीर करण्यात आली होती. परंतु जुलै-डिसेंबर 2021 ची वेतनवाढ अद्याप जाहीर झालेली नाही. डीएनएच्या अहवालानुसार, डीएमध्ये 3 टक्के वाढ सरकारकडून जाहीर केली जाऊ शकते. आता जाणून घ्या सरकारकडून हा निर्णय लागू झाल्यावर तुमच्या पगारामध्ये किती वाढ होऊ शकते.

डीए 31% पर्यंत वाढल्यास तुमचा पगार किती वाढेल? -

कर्मचाऱ्याचे मूळ वेतन18,000 रु

नवीन महागाई भत्ता (31%) रुपये 5580/महिना

विद्यमान महागाई भत्ता (28%) रुपये 5040/महिना

5580-5040 = रुपये 540/महिना

वार्षिक वेतन 540X12 = 6,480 रुपये वाढ (हेही वाचा: Ujjwala Yojana 2.0: उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत गॅस कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?)

डीएनए अहवालात नमूद केले आहे की, मे 2021 साठी इंडेक्समध्ये 0.5 पॉइंटच्या वाढीनंतर अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) 120.6 वर पोहोचला आहे. कामगार मंत्रालयाने जूनसाठी आकडेवारी जाहीर केली नाही. अहवालात म्हटले आहे की जूनच्या आकडेवारीमध्ये कोणतीही मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. एआयसीपीआय जूनमध्ये 130 पर्यंत पोहोचल्यास डीएमध्ये 4 टक्के वाढ जाहीर केली जाऊ शकते. परंतु AICPI ला एका महिन्यात 10 पॉइंटची वाढ करणे अशक्य आहे, त्यामुळे DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif