7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 81,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो पगार, जाणून घ्या सविस्तर
मात्र, यावर्षी फक्त एकदाच हा दर वाढवण्यात आला. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एकदा वाढ अपेक्षित आहे.
7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशींनुसार वेतन मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या (DA) दरात 3 टक्के वाढ झाल्यास, त्यांच्या पगारात 81,000 रुपयांपर्यंत वाढ होईल. सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत DA चा दर 28 टक्के आहे. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की केंद्राकडून हा डीए दर 3 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के डीए म्हणून मिळतील.
डीए दरात 3 टक्के वाढ झाल्यास, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारामध्ये त्यांच्या मूळ वेतनावर आधारित 6,480 ते 81,000 रुपयांच्या दरम्यान वाढ दिसून येईल. 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 ते जास्तीत जास्त 2,25,000 रुपये आहे.
डीएमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होईल. येत्या दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर का 31 टक्के डीए दर निश्चित झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन खालील प्रकारे वाढेल. (हेही वाचा: Petrol-Diesel Price in India: पेट्रोल-डिझेल दर आज स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाच्या किमती)
कर्मचार्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये असल्यास 31% डीए दराने तुमचे वेतन किती वाढेल ते जाणून घ्या-
विद्यमान महागाई भत्ता (28%) - 5040 रुपये/महिना
नवीन महागाई भत्ता (31%)- 5580 रुपये/महिना
फरक- 5580-5040 = 540 रुपये/महिना
वार्षिक वेतन 540X12 = 6,480 रुपये वाढ
जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 2,25,000 रुपये असेल-
विद्यमान महागाई भत्ता (28%)- 63,000 रुपये/महिना
नवीन महागाई भत्ता (31%)- 69,750 रुपये/महिना
फरक- 69,750 - 63,000 = 6,750 रुपये/महिना
वार्षिक पगार 6,750 X 12 = 81,000 रुपये वाढ
दरम्यान, सरकार दरवर्षी साधारणपणे दोनदा डीए दर वाढवते- जानेवारी आणि जुलैमध्ये. मात्र, यावर्षी फक्त एकदाच हा दर वाढवण्यात आला. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एकदा वाढ अपेक्षित आहे. 1 जुलैपासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 28 टक्के सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत डीए म्हणून मिळत आहेत. आता सरकार DA मध्ये 3 टक्के वाढ जाहीर करू शकते.