PM Kisan 18th Installment Date: पंतप्रधान किसान योजनेचा 18 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये जारी होण्याची शक्यता; 'असे' तपासा लाभार्थीचे नाव

17 व्या हप्त्याची रक्कम जून 2024 मध्ये आली. त्यामुळे आता पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येण्याची अपेक्षा आहे.

Farmer | Pixabay.com

PM Kisan 18th Installment Date: शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा होतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याच्या स्वरूपात जमा केली जाते. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपयांचा लाभ मिळतो. जून महिन्यात सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 17 वा हप्ता जमा केला होता. अधिकृत आकडेवारीनुसार, 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे. आता शेतकरी 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी येणार?

पीएम किसान योजनेंतर्गत दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होते. 17 व्या हप्त्याची रक्कम जून 2024 मध्ये आली. त्यामुळे आता पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हीही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. (हेही वाचा -PM Kisan Nidhi Funds: तिसऱ्या टर्ममधील पंतप्रधानांचा पहिला आदेश; पीएम किसान निधीच्या आदेशावर केली स्वाक्षरी)

PM किसान योजना लाभार्थी यादीतील नाव कसे तपासावे -