PM Surya Ghar-Muft Bijli Yojana: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत नोंदणीकृत 1 कोटी कुटुंबांना मिळणार मोफत विजेचा लाभ; काय आहे प्रक्रिया? जाणून घ्या

या योजनेला 75,021 कोटी रुपयांचा निधी लागणार असून या उपक्रमाअंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

PM Surya Ghar-Muft Bijli Yojana (PC -X/ANI)

PM Surya Ghar-Muft Bijli Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने महिन्याभरापूर्वी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना (PM Surya Ghar-Muft Bijli Yojana) जाहीर केली होती. अवघ्या एका महिन्यात देशभरातील सुमारे एक कोटी कुटुंबांनी या योजनेत नोंदणी केली आहे. पीएम मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पंतप्रधानांनी या माहितीला एक आश्चर्यकारक बातमी म्हटले आहे. त्यांनी लिहिले, देशाच्या सर्व भागातून नोंदणी केली जात आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमधून पाच लाखांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.

दरमहा 300 युनिट मोफत वीज -

ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. ते म्हणाले की, हा उपक्रम ऊर्जा उत्पादन सुनिश्चित करताना घरांसाठी वीज खर्चात लक्षणीय घट करण्याचे आश्वासन देतो. हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर पर्यावरणासाठी (LiFE) जीवनशैलीला चालना देण्यासाठी आणि एक चांगला ग्रह तयार करण्यासाठी योगदान देईल.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतावर सौर पॅनेल बसविण्यास मंजुरी दिली आहे. या योजनेला 75,021 कोटी रुपयांचा निधी लागणार असून या उपक्रमाअंतर्गत दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

अशा प्रकारे करा 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजने'साठी नोंदणी -

या योजनेद्वारे देशातील एक कोटी लोकांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल. यामुळे एक कोटी कुटुंबांची वार्षिक 18000 कोटी रुपयांची बचत होईल. याशिवाय उर्वरित वीज विकूनही ते उत्पन्न मिळवू शकतील. देशातील ज्या नागरिकांना वीजबिलाचा त्रास होत आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे.