महागाईत दिलासा! सीएनजी 6 रुपयांनी स्वस्त, पीएनजीच्या दरात 3.50 रुपयांनी घट

याशिवाय घरांना पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या एलपीजीचा (PNG) दरही प्रति घनमीटर 3.50 रुपयांनी कमी झाला आहे. शुक्रवारपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सीएनजी-पीएनजी (CNG-PNG) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 1 एप्रिलपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे, तर पीएनजीच्या किमती 3.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. वास्तविक, राज्यातील सरकारने सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट 3 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, त्यानंतर दोन्ही इंधनांच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. महानगर गॅस लिमिटेड या मुंबईतील गॅस पुरवठा कंपनीने सीएनजीच्या किरकोळ दरात प्रतिलिटर 6 रुपयांनी कपात केली आहे. याशिवाय घरांना पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या एलपीजीचा (PNG) दरही प्रति घनमीटर 3.50 रुपयांनी कमी झाला आहे. शुक्रवारपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

व्हॅटमध्ये मोठी कपात

महानगर गॅस लिमिटेडने सांगितले की, राज्य सरकारने 1 एप्रिलपासून नैसर्गिक वायूवरील व्हॅटमध्ये मोठी कपात केली आहे. यावरील व्हॅट आता 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच त्यात 10 टक्के कपात झाली आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि त्याच्या लगतच्या शहरांमध्ये सीएनजीची किरकोळ किंमत प्रति किलो 60 रुपये आणि घरगुती पीएनजीची किंमत 36 रुपये प्रति घनमीटर झाली आहे. सीएनजीच्या दरात आता 5.75 रुपये किलोने घट झाली आहे. (हे देखील वाचा: घर बांधणे आजपासून झाले महाग! Home Loan वर मिळणार नाही 'ही' अतिरिक्त सवलत)

नैसर्गिक वायूचे दर दुपटीने वाढले आहेत

केंद्र सरकारने एका दिवसापूर्वीच नैसर्गिक वायूच्या दरात दुपटीने वाढ केली आहे. नवीन दर 6 महिन्यांसाठी लागू आहेत. ONGC आणि ऑइल इंडिया सारख्या कंपन्यांनी नैसर्गिक वायूची किंमत $2.90 प्रति mmBtu वरून $6.10 प्रति mmBtu केली आहे. जागतिक बाजारात किमती वाढल्यानंतर कंपन्यांनी ही वाढ केली आहे.